Maharashtra shaheer: 'या' शाहीराचा प्रवास सिल्व्हर स्क्रीनवर, 'महाराष्ट्र शाहीर'ची रिलीज डेट जाहीर

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 28, 2022 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra shaheer release date: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची घोषणा केली. आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा शाहीर साबळेंच्या (Shahir Sable) आठवणीत रमला. हा सिनेमा कसा असणार? शाहीर साबळेंचा तो प्रवास सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आणायला केदार शिंदे (Kedar Shinde) सज्ज झालाय. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. (Kedar Shinde announced Maharashtra shaheer cinema release date)

Kedar Shinde announced Maharashtra shaheer cinema release date
शाहीर साबळेंचा प्रवास रुपेरी पडद्यावर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शाहीर साबळेंचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार
  • 'महाराष्ट्र शाहीर'ची रिलीज डेट जाहीर
  • अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारणार

Maharashtra shaheer release date: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची घोषणा केली. आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा शाहीर साबळेंच्या (Shahir Sable) आठवणीत रमला. हा सिनेमा कसा असणार? शाहीर साबळेंचा तो प्रवास सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आणायला केदार शिंदे (Kedar Shinde) सज्ज झालाय. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. (Kedar Shinde announced Maharashtra shaheer cinema release date)
 

मराठी सिनेसृ्ष्टीतल्या दिग्दर्शकांपैकी एक आघडीचं नाव म्हणेज दिग्दर्शक केदार शिंदे. नाटक, सिनेमा, मालिका अशा तिनही माध्यमांमध्ये अगदी सहज, लीलला वावरणारा हा दिग्दर्शक. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, गोपाळा रे गोपाळा अशी एकाहून एक सरस नाटकं तर श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, ऑन ड्युटी चोविस तास, आणि मधु इथे अन् चंद्र तिथे अशा दर्जेदार मालिका देणार हा दिग्दर्शक. अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमांचंही दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलंय. आता पुन्हा एकदा एक गॅपनंतर केदार शिंदे एक नवा कोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाची घोषणा त्यांनी कधीच केलेली होती. आता या सिनेमाच्या रिलीजची तारीख त्यांनी सांगितलीय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by (@omkar_mangesh)

अधिक वाचा : हरितालिकेच्या पवित्र व्रताचे मराठीतून द्या शुभेच्छापत्र

मात्र सिनेमाच्या रिलीजची डेट सांगताना त्यांनी हटके स्टाईलने सांगितली आहे. केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश यांची एक पोस्ट रिपोस्ट केली आहे. "शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा.. त्यांनी सिनेमात सुद्धा काम केलं होतं.. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ' वावटळ ' ह्या सिनेमात त्यांनी दादला नको ग बाई हे गाणं गावून त्यावर परफॉर्म सुद्धा केलं होतं..त्या नंतर अनेक सिनेमांच्या ऑफर त्यांना आल्या होत्या पण त्यांनी पुन्हा कधीही सिनेमासाठी गाणं गायलं नाही आणि पडद्यावर काम सुद्धा केलं नाही.. असं का? 
ह्या मागचं नेमकं काय कारण होतं?शाहीरांचा रोचक जीवन प्रवास उलगडणार ' महाराष्ट्र शाहीर ' ह्या सिनेमाद्वारे २८ एप्रिल २०२३ रोजी तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात..'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by (@omkar_mangesh)

आपल्या कलाकृतींमध्ये कायम विविध प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने सिनेमाची रिलीज डेटही हटके स्टाईलमध्ये सांगितली. अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमात 'महाराष्ट्र शाहीर'शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. शाहीर साबळेंच्या गेटअपसाठी अंकुश चौधरीच्या मेकअपवर खूप कष्ट घेण्यात आले आहेत.

अधिक वाचा : पत्नीच्या 'त्या' गोष्टीवर कुशलनं केलं React

तेव्हा पुन्हा एकदा केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव घ्यायला सज्ज व्हा. 'महाराष्ट्र शाहीर' हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी