पतीपासून वेगळी झाल्यानंतर १३ वर्षांनी लहान व्यक्तीसोबत लिव्ह इनमध्ये राहिली महाभारतातील ‘द्रौपदी’

मराठी पिक्चर बारी
Updated Apr 24, 2020 | 21:14 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सध्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारतला प्रेक्षकांची खूप पसंती मिळतेय.आज जाणून घेऊया महाभारतातील द्रौपदीच्या म्हणजेच अभिनेत्री रुपा गांगुलीच्या खाजगी आयुष्याबद्ल

Roopa Ganguly
महाभारतातील 'द्रौपदी'चं खाजगी आयु्ष्य सुद्धा राहिलंय संकटमय  

थोडं पण कामाचं

  • महाभारतातील द्रौपदी म्हणजेच अभिनेत्री रुपा गांगुली यांचं खाजगी आयु्ष्य देखील राहिलं संकटमय
  • १४ वर्ष संसार केल्यानंतर पतीसोबत घेतला घटस्फोट, त्यानंतर १३ वर्षांनी लहान व्यक्तीसोबत राहिल्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये
  • पतीसोबत भांडणामुळे तीन वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलंय. लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पण कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर घरात बसून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीय. अशावेळी लोकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि डीडी भारतीवर ‘महाभारत’ पुन्हा सुरू करण्यात आलंय. ८०-९०च्या दशकात रामानंद सागर यांच्या रामायण आणि बी. आर. चोप्रांच्या महाभारतनं सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्याकाळाप्रमाणेच आता सुद्धा या मालिकांना प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळतंय. ‘महाभारत’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. यात द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. जाणून घेऊया महाभारतात द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रुपा गांगुली यांच्या खाजगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दल...

महाभारतातील द्रौपदी म्हणजे अभिनेत्री रुपा गांगुली सध्या आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच खाजगी आयुष्याबद्दलही खूप चर्चा सुरू आहे. त्यांचं खाजगी आयुष्य काही खास चांगलं राहिलं नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. १९९२ साली त्यांनी धुब्रो मुखर्जी सोबत लग्न केलं होतं. सुरुवातीला सगळं चांगलं सुरू होतं त्यांना एक मुलगाही झाला. मुलगा लहान असतांनाच मात्र काही दिवसांनी त्यांच्यात मतभेद सुरू झाले. लग्नाच्या १४ वर्षांनंतर २००७ मध्ये दोघं वेगळे राहू लागले आणि २००९ साली अधिकृतरित्या घटस्फोट घेऊन ते वेगळे झाले.

रुपा गांगुली यांनी नवऱ्यासाठी आपलं करिअर सोडलं होतं आणि त्याच्यासोबत कोलकाताला त्या शिफ्ट झाल्या होत्या. त्या पूर्णपणे गृहिणी झाल्या होत्या, मात्र त्यांना दररोजच्या खर्चासाठी सुद्धा पैसे दिले जात नव्हेत. म्हणून मग त्या दोघा नवरा-बायकोमध्ये भांडणं सुरू झाले. या त्रासाला कंटाळून रुपा गांगुली यांनी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पतीसोबत वेगळं झाल्यानंतर रुपा यांनी त्यांच्यापेक्षा १३ वर्षांहून लहान असलेला गायक दिब्येंदु सोबत लिव्ह इनमध्ये राहणं पसंत केलं. मुंबईत ते दोघं राहत होते. पुढे जावून मात्र रुपा गांगुली दिब्येंदु पासून पण वेगळ्या झाल्या. त्या जेव्हा दिब्येंदु सोबत राहत होत्या तेव्हा त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. रिअॅलिटी शो ‘सच का सामना (२००९)’मध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक रहस्यांवरून पडदा उचलला होता.

रूपा गांगुली यांनी बॉलिवूडमध्ये 'साहेब' (१९८५), 'एक दिन अचानक' (१९८९), 'प्यार के देवता' (१९९०), 'बहार आने तक' (१९९०), 'सौगंध' (१९९१), 'निश्चय' (१९९२) आणि 'बर्फी' (२०१२) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. द्रौपदीच्या भूमिकेत प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी गौतम घोषच्या पोद्मा नोदीर माझी (१९९३), अपर्णा सेन यांच्या युगांत(१९९५) आणि रितुपर्णो घोष यांच्या अंतरमहल (२००६) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी