marathi actor bhalchandra kulkarni passed away : ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. ते आजारी होते. कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (शनिवार 18 मार्च 2023) सकाळी 6 वाजता त्यांचे निधन झाले. दुपारी 12 वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. । मराठी पिक्चर बारी । झगमगाट
कोल्हापूर येथे एका खासगी शाळेत शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केलेल्या भालचंद्र कुलकर्णी यांनी 300 पेक्षा जास्त मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. माहेरची साडी, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, पिंजरा यासह अनेक चित्रपटात काम केले.
कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. रा. छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही अनेक मालिकेतही त्यांनी काम केले होते. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. दिलेली भूमिका चोख करणे हे त्यांचे कौशल्य होते. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्रभूषण पुरस्कार देण्यात आला होता.
भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी, मासूम, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, माहेरची साडी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या.
‘हाई झुमका वाली पोर’ना चक्कर मा पोरं व्हयनात वेडा; आहिराणी गाण्याने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन