Pooja Sawant : मराठी अभिनेत्री पूजा सावंत झाली क्वारंटाइन

Marathi actress Pooja Sawant quarantined due to viral infection appeal fans to wear mask : मराठी सिनेमातील सध्याची लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आजारी पडली आहे. आजारी असल्यामुळे पूजा सावंत घरातल्या एका खोलीत क्वारंटाइन झाली आहे.

Marathi actress Pooja Sawant
मराठी अभिनेत्री पूजा सावंत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मराठी अभिनेत्री पूजा सावंत झाली क्वारंटाइन
  • आजारी असल्यामुळे पूजा सावंत झाली क्वारंटाइन
  • घेत आहे उपचार

Marathi actress Pooja Sawant quarantined due to viral infection appeal fans to wear mask : मराठी सिनेमातील सध्याची लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आजारी पडली आहे. आजारी असल्यामुळे पूजा सावंत घरातल्या एका खोलीत क्वारंटाइन झाली आहे. घरातल्या सदस्यांशी बोलताना ती सोशल डिस्टंस ठेवून आणि मास्क वापरून बोलत आहे. पूजा सावंत आराम करत आहे तसेच पौष्टिक आहार घेणे, औषध घेणे, काढा घेणे अशा प्रकारे तब्येतीची काळजी घेत आहे. 

आजारी असलेल्या पूजा सावंतने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकून हेल्थ अपडेट दिली. पूजा सावंतची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट बघून तिचे चाहते काळजीत पडले आहेत. अनेक चाहत्यांनी पूजा सावंत लवकर बरी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे तसेच तिच्या तब्येतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना केली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत हिने ताप आल्याचे आणि व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकून चाहत्यांना सांगितले. तिने चाहत्यांना तब्येत बरी नसल्यास काळजी घ्या आणि मास्क वापरा असे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा असेही आवाहन पूजा सावंत हिने केले आहे. 

अभिनेत्री पूजा सावंत हिने आतापर्यंत क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, बोनस, भेटली तू पुन्हा, लपाछपी, विजेता, नीलकंठ मास्तर या सिनेमांतून काम केले आहे. ती प्राण्यांसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांसोबत सामाजिक कार्य पण करते. 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

मेकअपशिवाय छान किती दिसते...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी