Prajakta mali instagram : 'या' कारणानं बोल्ड आणि बेधडक भूमिकेमुळे पुन्हा एकदा प्राजक्ता माळी ट्रोल

मराठी पिक्चर बारी
Updated Jul 21, 2022 | 18:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi Actress Prajkta Mali trolled : मराठी सिनेसृष्टीतील एक बेधडक आणि कायम चर्चेत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी. कधी सिनेमातील भूमिकेमुळे तर कधी सोशल मीडियावरील फोटोंमुळे तर कधी एखाद्या राजकीय पोस्टमुळे प्राजक्ता माळी ( Prajakta mali ) ट्रोल होते. यावेळीही अशाच काहीशा वादादित कारणामुळे प्राजक्ता ट्रोल झालेली आहे. पाहुया नक्की काय कारण आहे प्राजक्ता ट्रोल व्हायचं.

Marathi actress prajakta mali trolled after posted photos in saree on social media
'या' कारणामुळे प्राजक्ता माळी पुन्हा ट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्राजक्ता माळी या कारणामुळे पुन्हा एकदा ट्रोल
  • बोल्ड आणि बेधडक भूमिकेमुळे प्राजक्ता माळी ट्रोल
  • यावेळी न्यूजपेपरची प्रिंट असलेली साडी नेसल्यामुळे प्राजक्ता माळी ट्रोल

Prajakta mali instagram : मराठी सिनेसृष्टीतील एक बेधडक आणि कायम चर्चेत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी ( Prajakta mali ). कधी सिनेमातील भूमिकेमुळे तर कधी सोशल मीडियावरील फोटोंमुळे तर कधी एखाद्या राजकीय पोस्टमुळे प्राजक्ता माळी ट्रोल होते. यावेळीही अशाच काहीशा वादादित कारणामुळे प्राजक्ता ट्रोल झालेली आहे. यावेळीही अशाच एका हटके पोस्टमुळे प्राजक्ता माळी सोशल मीडियावर ट्रोल झाली. ( Marathi actress prajakta mali trolled after posted photos in saree on social media )


रानबाजार या वेबसीरिजमुळे प्राजक्ता माळी चर्चेत आली. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये (Web series ) साकारलेली होती. या वेबसीरिजचा टीझर रिलीज झाला त्यावेळी प्राजक्ता माळी ट्रोल झालेली होती. नेहमीच सोज्ज्वळ, साध्या भूमिका करणाऱ्या प्राजक्ताने खूपच हटके आणि एकदम बोल्ड भूमिका वठवली होती. त्यामुळे संस्कृती, आणि संस्कार अशा अनेक मुद्द्यांवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी प्राजक्ताने ती भूमिकेची गरज असल्याचं सांगत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. 

अधिक वाचा : कॉलेज विद्यार्थ्यांचं लीप लॉक चॅलेंज, Lip lock व्हिडिओ VIRAL

त्यानंतर पुन्हा एकदा एका राजकीय पोस्टमुळे ती चर्चेत आली होती. त्यावेळीही तिला असंच ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. मात्र, यावेळी ट्रोल होण्याचं कारण काहीसं हटके आहे. आणि ते म्हणजे प्राजक्ताने नेसलेली ही साडी. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताचा फॅशन सेन्स
खूपच चांगला आहे. मात्र, कधीकधी यामुळे तिला ट्रोल व्हावं लागतं. 

आताही प्राजक्ताने नेसलेली ही साडी न्यूजपेपरच्या प्रिंटची आहे. त्यामुळे प्राजक्ता सोशल मीडियावर ट्रोल झालेली आहे. नुकताच तिने या साडीतील दुसरा फोटो शेअर 
केला आहे. याआधीही या साडीतील फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. याला कॅप्शन देताना “पॅरिसमधील संध्याकाळ, (ही साडी समर कलेक्शनची आहे, फोटो पोस्ट करता करता पावसाळा उजाडला…असो, दुसऱ्या उन्हाळ्यासाठी बघून ठेवा)”, असे तिने म्हटले होते. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

अधिक वाचा : जाणून घ्या रुद्राभिषेकाचे अद्भुत लाभ


या ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत प्राजक्ताने पुन्हा एकदा याच साडीतील नवा फोटो शेअर केला आणि कॅप्शन देताना म्हटले, “आजच्या ठळक बातम्या-माळी टाईम्स. (आजचं कॅप्शन परवाच्या कमेंट्समधून ढापलेलं आहे. म्हणून बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव- मथळा मराठीत आहे.) 


आता प्राजक्ता माळीची ही नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. एका यूजरने म्हटले आहे, पेपर सोबत ची "पुरवणी" कुठंय.... #प्राजु, तर दुसऱ्याने, "आजची ठळक बातमी खूपच आवडली ♥️"अशी कमेंट केलेली आहे. काहींनी तर "छानच सुंदर ❤️प्राजक्ताची माहीती हवी असल्यास❤️माळी टाईम्स अवश्य वाचा " असेही म्हटले आहे. 


एकूणचं काय तर नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असणारी प्राजक्ता यावेळीही अशाच एका बोल्ड आणि ब्युटिफुल गोष्टीमुळे चर्चेत आलेली आहे. साडी कशीही असो ती प्राजक्तावर खुलून दिसत आहे हे मात्र नक्की. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी