सफाई कर्मचा-यांच्या ‘दैवी’ कर्माला तेजस्विनी पंडितचं दडवंत

. तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांना आणि दुस-या दिवशी पोलिसांचे आभार मानल्यानंतर नवरात्रीच्या तिस-या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचा-यांचे आभार मानले आहे. 

marathi actress tejaswini pandit navratri special photshoot day 3
सफाई कर्मचा-यांच्या ‘दैवी’ कर्माला तेजस्विनी पंडितचं दडवंत   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते.
  • दुसऱ्या दिवशी कोणत्याही सणासुदीच्या दिवशी घरी न राहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम तत्परत असतात. त्याचे आभार मानले होते.
  • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तेजस्विनीने डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला होता.

मुंबई : आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. यंदा ती कोरोनायोद्धांना आपल्या फोटो Illustration मधून ट्रिब्यूट देत आहे. तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांना आणि दुस-या दिवशी पोलिसांचे आभार मानल्यानंतर नवरात्रीच्या तिस-या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचा-यांचे आभार मानले आहे. 

हातात झाडू घेऊन रस्त्यावर उभी ठाकेलेली रणरागिणी आपल्या फोटोमधून तेजस्विनीने साकारलीय. तेजस्विनी पंडित तिस-या दिवशीच्या फोटोशूटविषयी सांगते, “दुर्गामातेने आपल्या शक्तीशाली त्रिशूळाने असुराचा वध केला होता. कोरोनारूपी असुराला पळवून लावायचे असेल, तर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन महत्वाचेच ना.. कोरोना काळात स्वच्छता कर्मचा-यांच्या हातातल्या मोठ्या झाडूने ही त्रिशूळाचेच तर काम केले होते. त्यांच्यातल्या त्या दैवी कर्मांमुळेच तर आपण प्रत्येक गल्ली-बोळात, गावात, पाड्यात, शहरात स्वच्छता पाहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पुढे म्हणते, “आपण लहानपणापासून ऐकलंय, जिथे स्वच्छता असेल. तिथेच लक्ष्मीचा वास असतो. आणि वर्षाचे 365 दिवस दारोदारी स्वच्छता करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात. त्यांच्यातल्या दैवीरूपाला माझे ह्या फोटोशूटद्वारे नमन.”

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या ह्या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते. आणि सध्या कोरोनायोद्धांना तेजस्विनीने मानलेले आभार रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी