Marathi Celebrity RakshaBandhan : आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सेलिब्रिटींनीही जपली बहिण-भावाच्या नात्याची वीण, साजरे केले अनोखे'रक्षाबंधन'

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 11, 2022 | 12:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi Celebrity Raksha Bandhan : बहिण-भावाच्या नात्याचे महत्त्व सांगणारा, त्यांच्या नात्यामधील जिव्हाळा, प्रेम जपणार सण म्हणजे रक्षाबंधन (RakshaBandhan ) . रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मराठी सेलिब्रिटींनीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत अभिनेत्री दीपा परब-चौधरी (Dipa Parab-Chaudhari) , पल्लवी पाटील (Pallavi Patil ) आणि धनश्री काडगावकर (Dhanshri Kadgaonkar ) यांनी रक्षाबंधनचा सण साजरा केला.

Marathi Celebrity's RakshaBandhan Celebration
मराठी सेलिब्रिटींचे 'रक्षाबंधन'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहिण-भावाच्या नात्याची वीण
  • सेलिब्रिटींचे अनोखे रक्षाबंधन
  • अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील, आणि धनश्री काडगावकरचे रक्षाबंधन

Marathi Celebrity RakshaBandhan : बहिण-भावाच्या नात्याचे महत्त्व सांगणारा, त्यांच्या नात्यामधील जिव्हाळा, प्रेम जपणार सण म्हणजे रक्षाबंधन ( Raksha Bandhan ). रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मराठी सेलिब्रिटींनीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत अभिनेत्री दीपा परब-चौधरी ( Dipa Parab) , पल्लवी पाटील ( Pallavi Patil ) आणि धनश्री काडगावकर ( Dhanshri Kadgaonkar ) यांनी रक्षाबंधनचा सण साजरा केला. ( Marathi Celebrity's RakshaBandhan Celebration )

झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणारी अभिनेत्री पल्लवी पाटील भावासोबतच्या आपल्या नात्याबद्दल सांगत की, "मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांनाही त्याच प्रेमाने, आपुलकीने राखी बांधते. आम्ही सर्व एकत्र जमलो की खूप धम्माल करतो." पल्लवी पुढे म्हणते की, "माझ्या लहानपणी मलाही कोणीतरी राखी बांधून दादा म्हणवं असं वाटायचं, मग ती इच्छा मी माझ्या बहिणी मला राखी बांधून पूर्ण करायच्या. बालपणीची ही आठवण अजूनही स्मरणात आहे. आम्हा भावंडांचं नातं खूप गोड आहे. "

अधिक वाचा : चुकूनही या गोष्टी हातात देऊ नका...नाहीतर होईल नुकसान


तर दुसरीकडे, अभिनेत्री दीपा परब बऱ्याच कालावधीनंतर "तू चाल पुढं" या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या भावशी असलेल्या नात्याबद्दल सांगतांना दीपा म्हणते, "माझा भाऊ कायम माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे, माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साह देतो. माझं काम त्याला खूप आवडते. तो नेहमी मला नवीन नवीन गोष्टी  सुचवत असतो. यंदाही तितक्याच उत्साहात आणि दणक्यात आम्ही सेलिब्रेशन करू". हे सांगताना दीपाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

अधिक वाचा : राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक, एम्समध्ये दाखल

अधिक वाचा : विजय देवरकोंडा करण जोहरवर नाराज?

तर याच मालिकेत म्हणजेच, 'तू चाल पुढं' या मालिकेत शिल्पीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणते की, आम्ही लहानपणी खूप भांडायचो, भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतच असायचं. भाऊ दर रक्षाबंधनाला न चुकता माझ्यासाठी छानसं गिफ्ट आणायचा, मात्र, मला चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. भावाचं आणि माझं नातंच वेगळं आहे. एकूणंच काय तर मराठी सेलिब्रिटींनीही दणक्यात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी