Baba at Golden Globes: ‘बाबा’चा साता समुद्रापार गवगवा, ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये खास स्क्रिनिंग

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 18, 2019 | 15:25 IST | चित्राली चोगले

ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कथा असलेल्या बाबा हा मराठी सिनेमाना मध्यंतरी रिलीज झाला. सिनेमाने भारतात बरीच लोकप्रियता मिळवली आता सिनेमा थेट परदेशात पोहचला आहे, गोल्डन ग्लोब्जमध्ये.

marathi film baba has a special screening at golden globes los angeles
Baba at Golden Globes: मराठी सिनेमा ‘बाबा’चा साता समुद्रापार गवगवा, ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये खास स्क्रिनिंग 

थोडं पण कामाचं

  • 'बाबा' या मराठी सिनेमाची थेट परदेशात दखल
  • हॉलिवूडच्या प्रसिद्ध ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एँजलीस’मध्ये झालं खास स्क्रिनिंग
  • ५ जानेवारी २०२० रोजी नामांकनं होणार जाहीर

मुंबई: काही महिन्यांपूर्वी वडिल आणि मुलाची हळवी गोष्ट सांगत बाबा हा मराठी सिनेमा भेटीला आला. ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि त्याचा दत्तक घेतलेला मुलगा यांची अत्यंत नाजूक अशी कथा असलेल्या बाबा या मराठी सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सगळ्या स्थरातून सिनेमाचं कौतुक केलं गेलं. आता याच हळव्या सिनेमाने थेट साता समुद्रापार देखील मनं जिंकली आहेत. या सिनेमाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एँजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’साठी झाली असून सिनेमाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं आहे.

ही या सिनेमाठी नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे हे नक्की. तितकीच ती मराठी इंडस्ट्रीसाठी देखील निश्चितपणे तितकीच खास आहे. बाबा सिनेमाच्या कथेने अनेकांची मनं जिंकली आहेत, त्यामुळे सिनेमा या खास गोल्डन ग्लोब्सच्या स्क्रिनिंगमध्ये देखील आवडला गेला असेल यात दुमत नाही. या सगळ्याबद्दलची माहिती या सिनेमाचे निर्माते ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार आणि संजय दत्त प्रॉडक्शन्स यांनी नुकतीच दिली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My film Baba is releasing on 2nd August. Here is the trailer. Enjoy ?

A post shared by Deepak Dobriyal ( Asli Wala ) (@deepakdobriyal1) on

 

बाबाच्या या यशाबद्दल अधिक व्यक्त होत आरती सुभेदार म्हणाल्या, “दीपक दोब्रीयाल यांच्या अत्यंत प्रतिभावान अशा अभिनयाने नटलेल्या आणि तेवढ्याच प्रतिभाशाली अशा नंदिता पाटकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांचा अभिनय असलेला आणि राज गुप्ता यांच्या तन-मन अर्पून दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झाली. आता आम्हाला या चित्रपटाच्या नामांकनाची प्रतीक्षा आहे,”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Kya bolte ho, wo sahi bol rahi hai???

A post shared by Deepak Dobriyal ( Asli Wala ) (@deepakdobriyal1) on

 

मराठी सिनेमा कायम कन्टेन्टच्या दृष्टीने खूपच श्रीमंत असतात. मराठी सिनेमा कायम कथेच्या बाबतीत अग्रगण्य राहीलेले आहेत. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ने या क्षेत्रात पाऊल टाकले ते अर्थपूर्ण कथेच्या सिनेमांची निर्मिती ही जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसाठी करण्याच्या उद्दिष्टाने. माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेला ‘बकेट लिस्ट’ हा त्यांचा पहिला प्रादेशिक सिनेमा. हा सिनेमा देखील जागतिक स्तरावर नावाजला गेला. या त्यांच्या पहिल्या निर्मितीनंतर निर्मात्यांनी राज गुप्ता यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या ‘बाबा’ या सिनेमाला पाठबळ दिले.

 

 

तर बाबा सिनेमाच्या या यशाबद्दल बोलताना खुद्द दीपक दोब्रीयाल म्हणाला की, “बाबा हा मला खूपच प्रिय असलेला एक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा पहिल्यांदा मला ऐकवली गेली, तेव्हापासून तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे. अशाप्रकारच्या चित्रपटामध्ये काम करणे हे कोणत्याही कलाकारासाठी एक मोठी गोष्ट असते आणि या चित्रपटातील माधवची भूमिका करण्याची संधी मला मिळाली याचा मला मनस्वी आनंद आहे.” बाबाचं स्क्रिनिंग तर उत्तम पार पडलं आहे, त्यामुळे ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या ’गोल्डन ग्लोब्ज’च्या नामांकनांच्या यादीत सिनेमा प्रवेश करेल, अशी पूर्ण खात्री सध्या सिनेमाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केली आहे. त्यांना त्यांच्या या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी