Marathi Film Festival चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव होणार

Marathi Film Festival in Chitranagari Goregaon Mumbai महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन आहे. 

Marathi Film Festival in Chitranagari Goregaon Mumbai
चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव होणार 
थोडं पण कामाचं
  • चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव होणार
  • महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन
  • लोककलावंताचे वार्षिक संमेलन, महाराष्ट्र महोत्सव, मराठी  चित्रपट पुरस्कार, लोकोत्सव यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि फिल्मसिटी पुढाकार घेणार

Marathi Film Festival in Chitranagari Goregaon Mumbai मुंबईः महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन आहे. 

Sonali Bendre on OTT : सोनाली बेंद्रे, सुष्मिता सेन आणि रवीना टंडनच्या वाटेवर, Zee5 च्या या वेबसीरिजद्वारे OTT पदार्पण करणार

गेल्या काही वर्षांमध्ये मराठीमध्ये आशयघन चित्रपट आलेले आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हे सिनेमे पाहण्याची संधी प्रेक्षकांना फिल्मसिटीमार्फत उपलब्ध होणार आहे. लोककलावंताचे वार्षिक संमेलन, महाराष्ट्र महोत्सव, मराठी  चित्रपट पुरस्कार, लोकोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि फिल्मसिटी पुढाकार घेणार आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे दरवर्षी  एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि कलाकार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पुढाकार घ्यावा. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची माहिती एका ठिकाणी मिळावी यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी