Hirkani Song Teaser: ९ कलाकार, ६ लोककला आणि शिवरायांना मुजरा, हिरकणी सिनेमातलं 'हे' गाणं उद्या भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 09, 2019 | 20:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिरकणी हा भव्य दिव्य मराठी ऐतिहासिक सिनेमा नुकताच जाहीर झाला. सिनेमाबद्दल उत्सुकता ताणली गेली असतानाच सिनेमाचं एक अतिशय महत्त्वाचं गाणं लवकरच रिलीज केलं जाणारय. गाण्याची झलक देण्यासाठी एक टीझर नुकताच रिलीज झाला

marathi film hirkani song on shiv rajyabhishek teaser is out
Hirkani Song Teaser: ९ कलाकार, ६ लोककला आणि शिवरायांना मुजरा, हिरकणी सिनेमातलं हे गाणं उद्या भेटीला पण झलक आता 

थोडं पण कामाचं

  • ९ कलाकार ६ लोककलेतून देणार शिव छत्रपतिंना मानाचा मुजरा
  • हिरकणी सिनेमातलं शिव राज्याभिषेक गाण्याचा टीझर भेटीला
  • अंगावर शहारा आणणाऱ्या गाण्याची झलक

मुंबई: मराठी इंडस्ट्रीमध्ये नुकतंच एक वेगळं कॅम्पेन राबवलं गेलं. ‘प्रत्येक आई असतेच…’ हे लिहिलेलं एक पोस्टर व्हायरल होताना दिसलं आणि त्या भोवती एक वेगळंच कुतुहल निर्माण झालं. हे सगळं एका सिनेमासाठी केलं जात आहे हे तर फार स्पष्ट होतं पण तो सिनेमा नेमका कोणता आणि सिनेमाचं नाव काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले. अखेर या प्रश्नांची उत्तरं देत हिरकणी हा आगामी मराठी सिनेमा घोषीत झाला आणि सिनेमाची रिलीज डेट सुद्धा जाहीर झाली. 'प्रत्येक आई असतेच...हिरकणी' असं सिनेमाचं घोष वाक्य आहे. या सिनेमाबद्दलची उत्सुकता लक्षात घेता ती अधिक ताणण्यासाठी सिनेमातलं एक महत्त्वाचं गाणं लवकरंच रिलीज होणार आहे. याच गाण्याचा टीझर सध्या भेटीला आला आहे.

हिरकणी हा ऐतिहासिक सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडेल हे काय वेगळं सांगायला नको. याच सुवर्ण ऐतिहासिक काळातले अनेक महत्त्वाचे प्रसंग सिनेमात अनुभवायला मिळणार आहेत. याच प्रसंगांमधील एक खूप महत्त्वाची गोष्ट होती शिवराज्याभिषेक सोहळा. सिनेमातल्या लवकरच रिलीज होणाऱ्या गाण्यात याच बहुमोल सुवर्ण प्रसंगाची पुनरावृत्ती होताना दिसेल. ९ कलाकार, ६ लोकलेच्या माध्यामातून आपल्या जाणता राजा असलेल्या शिवाजी महाराजांना मुजरा करताना या गाण्यात दिसणार आहेत. या शिराज्याभिषेक गीताचं टीझर नुकतंच भेटीला आलं आहे आणि ते पाहून अंगावर शहारा आल्या शिवाय राहत नाही हे नक्की. त्यामुळे या सिनेमा इतकीच आता उद्या येणाऱ्या या शिव राज्याभिषेक गीताची उत्सुकता देखील वाढली आहे.

शिवरायांना मानाचा मुजरा देणाऱ्या या गाण्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियद्रश्न जाधव, जितेंद्र जोशी, सुहास जोशी, क्षिती जोग आदी असे ९ कलाकार दिसणार आहेत. तर या सिनेमात शिवरायांच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याची झलक सुद्धा या गाण्यातून बहुदा दिसेल असं बोलंल जात आहे. कच्चा लिंबू या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या सिनेमानंतर प्रसाद ओक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसायला सज्ज झाला आहे ते या सिनेमासाठी. तसंच त्याला साथ लाभणार आहे अजून एका राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या नावाची म्हणजेच राजेश म्हापुसकर यांची.

 

हिरकणीची गोष्ट अनेकांना माहित आहे. हिच गोष्ट मोठ्या स्क्रिनवर नव्याने अनुभवायला मिळणं हा एक वेगळा अनुभव असणार आहे. सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज केलं गेलं आणि त्यात थोडक्यात हिरकणी या धाडसी आईची गोष्ट समोर आली. या मोशन पोस्टरमध्ये गडावर उभे असलेले शिवाजी महाराज सुद्धा दिसतात आणि त्याचसोबत दिसतं सिनेमातलं मुख्य पात्र, खांद्यावर बाळ घेऊन पाठमोरी उभी असलेली हिरकणी. इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल द्वारा निर्मित आणि लॉरेन्स डिसुझा द्वारे सह-निर्मित या सिनेमाबद्दलची उत्सुकता निश्चितंच ताणली गेली आहे. त्यात सिनेमाचं हे शिव राज्याभिषेक गीत येताच ती अधिक वाढणार आहे यात पण काही वाद नाही. पण असं असलं तरी सिनेमासाठी प्रेक्षकांना येत्या २४ ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Hirkani Song Teaser: ९ कलाकार, ६ लोककला आणि शिवरायांना मुजरा, हिरकणी सिनेमातलं 'हे' गाणं उद्या भेटीला Description: हिरकणी हा भव्य दिव्य मराठी ऐतिहासिक सिनेमा नुकताच जाहीर झाला. सिनेमाबद्दल उत्सुकता ताणली गेली असतानाच सिनेमाचं एक अतिशय महत्त्वाचं गाणं लवकरच रिलीज केलं जाणारय. गाण्याची झलक देण्यासाठी एक टीझर नुकताच रिलीज झाला
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
"रॉमकॉम'च्या रुपानं मराठीत पहिल्यांदाच अनोखा प्रयोग, सिनेमाचं थ्रीडी पोस्टर भेटीला