Satarcha Salman 2 Heroines: 'सातारचा सलमान' सिनेमात या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 11, 2019 | 23:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

सलमानंच आहे... फक्त सातारचा आहे. असं म्हणत सातारचा सलमान या मराठी सिनेमाचा टीझर भेटीला आला. त्यानंतर सिनेमाची बरीच चर्चा रंगली. पण सिनेमात हिरोईन म्हणून कोण झळकणार हे गुपित होतं. अखेर सिनेमात २ नायिका झळकणारेत.

marathi movie satarcha salman to have two female leads sayali sanjeev and shivani surve
Satarcha Salman 2 Heroines: 'सातारचा सलमान' सिनेमाच्या 2 मुख्य नायिकांचा अखेर उलघडा 

थोडं पण कामाचं

  • सातारच्या सलमान या आगामी सिनेमात दिसणार २ मुख्य नायिका
  • सुयोग गोऱ्हेसोबत सायली संजीव आणि शिवानी सुर्वे झळकणार
  • सिनेमाच्या नवीन पोस्टर्सवर शिवानी-सायलीच्या भूमिकांची ओळख

मुंबई: ‘सलमानंच आहे... फक्त सातारचा आहे…’ असं म्हणत नुकतीच एन्ट्री झाली ते ‘सातारच्या सलमान’ सिनेमाच्या टीझरची. सिनेमाच्या नावाबद्दल एक वेगळंच कुतुहल होतं. त्यानंतर सिनेमाचा टीझर भेटीला आला आणि सिनेमाची बरीच चर्चा रंगली. ‘स्वप्नं बघितली तरच खरी होतात…’ अशी टॅगलाईन असलेल्या 'सातारचा सलमान' या आगामी मराठी सिनेमात सलमानच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सुयोग गोऱ्हे झळकणार आहे हे आधीच घोषीत झालं होतं. पण सिनेमात सुयोगच्या अपोझिट कोण झळकणार याबद्दलची उत्सुकता मात्र लागलेली होती. टीझरमध्ये सुद्धा त्याचा उलगडा झाला नाही. आता मात्र या सिनेमात एक नाही तर दोन नायिका असणार असं समजतंय.

सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झाला आणि सिनेमाबद्दल उत्कंठा तर निर्माण झाली पण आता सिनेमात दोन नायिका दिसणार हे जाहीर होताच सिनेमाची वेगळीच चर्चा होऊ लागली आहे. तरुणींना भुरळ घालणाऱ्या सुयोग म्हणजेच सातारच्या सलमानला सिनेमात दोन हिरोईन असणार आहेत. अखेर गुलदस्त्यात असलेल्या दोन नायिकांची नावं समोर आली आहेत आणि त्या आहेत सायली संजीव आणि शिवानी सुर्वे. या सिनेमात या दोन अभिनेत्री आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

नुकतेच या दोघींचे कॅरेक्टर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहेत. पोस्टरवरील दोघींच्या कॅरेक्टर्सचा अंदाज या पोस्टर्सवरुन बांधता येतो. सायलीचा लूक पाहता ती एकदम साध्या सरळ गावाकडच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल असं दिसतंय. तिच्या कॅरेक्टरचं नाव सिनेमात माधुरी माने असेल आणि त्या कॅरेक्टरमधला निरागसपणा या नवीन पोस्टरवर अगदी स्पष्ट दिसत आहे. जिथे सायली सोज्वळ मुलीची भूमिका साकारत आहे तिथे बिग बॉस फेम शिवानी दीपिका भोसले या बोल्ड अवतारात सिनेमात दिसेल. बिनधास्त आणि एकदम डॅशिंग लूकमध्ये या पोस्टर्सवर शिवानी दिसते.

 

 

आता सिनेमांच्या नायिकांच्या भवती असलेलं कोडं तर मिटलं पण एक नवीन कोडं निर्माण झालं आहे. या दोघींपैकी सिनेमात सुयोगची नायिका नेमकी कोण आहे हे मात्र अद्यापतरी समजू शकलेलं नाहीये आणि ते इतक्यात समजेल असं दिसत नाही. कारण या दोघींपैकी कोणीतरी एक की या दोघी सातारच्या सलमानसोबत रोमान्स करतात हे समजायला सिनेमा पहावा लागणार आहे. टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमेने केलं आहे. हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या सिनेमात सुदधा प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार, भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की. या धमाकेदार सिनेमासाठी मात्र प्रेक्षकांना येत्या ११ ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Satarcha Salman 2 Heroines: 'सातारचा सलमान' सिनेमात या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत Description: सलमानंच आहे... फक्त सातारचा आहे. असं म्हणत सातारचा सलमान या मराठी सिनेमाचा टीझर भेटीला आला. त्यानंतर सिनेमाची बरीच चर्चा रंगली. पण सिनेमात हिरोईन म्हणून कोण झळकणार हे गुपित होतं. अखेर सिनेमात २ नायिका झळकणारेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय