मुंबई : NCPIL च्या महिलांसाठी ज्या योजना आहेत, त्या योजना प्रकर्षाने दर्शवणारा लघुचित्रपट सपनों की पाठशाला 29 मे रोजी डीडी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. या लघुपटात मीरा जोशींनं मुख्य भूमिका साकारली आहे. सपनों की पाठशाला या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन अमृतेश श्रीवास्तव आणि निर्माते दीपक शर्मा, कास्टिंग डायरेक्टर राज पांडे आहेत. मीरा जोशीसह अभिनेता मनीष शर्मा तिच्या नवऱ्याचा भूमिकेत दिसणार आहे.
या लघुचित्रपटाविषयी मीरा जोशींने अनेक किस्से सांगितले आहेत. मीरा म्हणाली की, हा चित्रपट म्हणजे एक भावनिक व हृदयस्पर्शी कथा आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे, सरकारकडून नेहमीच समाज प्रबोधनाचे काम होत असते, मला सुद्धा या कामात खारीचा वाटा मिळाला याचा आनंद असल्याचं ती म्हणाली. माझा हा गावातील एक कार्यक्षम महिला साकारण्याचा पहिलाच अनुभव होता, याआधी शहरातील कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी किंवा व्हिलन असेच पात्र साकारले. निरागस, अतिशय मेहनाती आणि नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी, काहीतरी स्वतःच्या स्वबळावर करून दाखवण्याची जिद्द असलेली अशी भूमिका पाहिलांदाच साकारायला मिळाली आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आल्याचं मीराने यावेळी सांगितले.
हा चित्रपट शिलाई मशीनवर आधारित आहे. त्यामुळे मशीन चालवता येणे खूप महत्वाचे होते. माझ्या घरी आई ला मी लहानपणासूनच मशीन चालवताना पहिले होते, त्यामुळे मला त्याचे लहान पणापासूनच धडे मिळाले होते, त्याचा शूटिंगच्या वेळी खूप फायदा झाला. दरम्यान, या चित्रपटाचे चित्रीकरण तारापूर या वास्तविक गावात जाऊन केले आहे. यावेळी बोलताना मीरा म्हणाली की, तिकडच्या महिलांचे राहणीमान बोलण्याची आणि चालण्याची पद्धत हे सर्व अभ्यास करून बघून काम करण्यात खूप मजा आल्याचं ती म्हणाली. नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच गावातील काही नवीन मैत्रिणी मला मिळाल्या. खेडे गावामधल्या बायका जे काही करतात ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले आणि अनुभवायला सुद्धा मिळाल्याचं मीरा जोशींने सांगितलं.
या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान, घडलेल्या किस्सांविषयी बोलताना मीरा म्हणाली की, मला एक किस्सा सांगावासा वाटतो, तो म्हणजे चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. जिथे मला पाटावर बसून भांडी घासायची होती, तो सिन शूट करताना कधी माझी साडी पाण्यात भिजायची तर कधी लोळायची आपल्याला नेहमी किचनमध्ये ओट्यासमोर उभा राहून भांडी घासायची सवय असल्याने फजिती झाली होती, यावेळी तिथल्या एका महिलेने मला प्रत्यक्षात शिकवलं कि कसं पाटवर बसायचं, कसं भांड धरायचं आणि घासायचं हे सर्व सांगितलं.
सपनों की पाठशाला
कहाणी तारा की...
हा लघुचित्रपट येत्या 29 मे ला रात्री 7:50 ला डी डी नॅशनल वर रिलिज होतोय, नक्की बघा.