हिंदीवाल्यांमुळे मराठी चित्रपटांना 'दे धक्का', मुजोरी थांबवण्यासाठी मनसे आक्रमक

box office : बॉलिवूडमधल्या या दोन बड्या कलाकारांच्या चित्रपटांला बॉक्स ऑफिसवर टक्कर असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

MNS is aggressive to stop Marathi films from 'hitting', Mujori because of Hindi
हिंदीवाल्यांमुळे मराठी चित्रपटांना 'दे धक्का', मुजोरी थांबवण्यासाठी मनसे आक्रमक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे दोन हिंदी चित्रपट रिलीज झाले.
  • या दोन बड्या कलाकारांना टक्कर देण्यासाठी दे धक्का २ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
  • मराठी सिनेमांचे शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

मुंबई : रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. दरम्यान, महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित दे धक्का २ ही प्रदर्शित झाला.  'लाल सिंग चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' हे दोन्ही चित्रपट पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे कमाई करु शकले नाहीत. तर दे धक्का 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. (MNS is aggressive to stop Marathi films from 'hitting', Mujori because of Hindi)

अधिक वाचा : Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या मुलीचा देसी गर्ल लूक व्हायरल

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटींचा व्यवसाय केला आहे, तर अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'ने गुरुवारी, ११ ऑगस्ट रोजी अवघ्या ७.५ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर दुसरीकडे दे धक्का या चित्रपटचा तब्बल १४ वर्षानंतर महेश मांजरेकर सिक्वेल घेऊन आले आहेत . दे धक्का २ या चित्रपटात शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या सारखी तगडी स्टार कास्ट आहे.

अधिक वाचा : VIDEO: "मलायका अरोरासोबत लग्न करणार नाही" पाहा अर्जुन कपूर असं का म्हणाला?

या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. यावर अभिनेता सिध्दार्थ जाधव याने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे की,  संपूर्ण महाराष्ट्रभर 'दे धक्का 2' प्रदर्शित झाला आहे. सिनेमा हाऊसफुल झाला असून धिंगाना प्रतिसाद पहायला मिळतोय. धिंगाना ऑडियन्स आहे, धिंगाना पब्लिक आहे, धिंगाना रिसपॉन्स आहे'. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दरम्यान, या चित्रपटाचे निर्माते आणि मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन थिएटरमधील मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. तसेच गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या टाईमपास ३, दे धक्का २ आणि एकदा काय झालं या मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झालेले आहेत. लालसिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे हे शोज कमी करण्यात आले आहेत.

ज्याठिकाणी मराठी चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी मिळते तिथूनही हद्दपार करण्यात आलंय. तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का? मोठा वीकेंड आहे म्हणून बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटांनाही कमाई करायची आहे. हे लक्षात न घेता जी मुजोरी हिंदीवाल्यांनी चालवली आहे ती त्वरित थांबली पाहिजे आणि मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी