Vaishali Bhaisne-Made's facebook post: सारेगमप विजेती गायिक वैशाली-भैसने माडे तिच्या फेसबुक पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वैशालीने आपल्या जीवाला धोका असल्याचं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाउंटवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं
वैशालीने म्हटलं आहे. तसंच याबाबतचा सर्व खुलासा 2 दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.
फेसबुक पोस्टवर वैशालीने नक्की काय म्हटलं आहे पाहुया.'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौफायस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे'. असे या पोस्टमध्ये वैशालीने म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तर पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा सल्लाही वैशालीला दिलेला कमेंट्समध्ये दिसत आहे.
आता नेमकं हे प्रकरण काय आहे, हे 2 दिवसांनंतर वैशाली पत्रकार परिषद घेईल तेव्हाच कळेल.
वैशाली भैसने 2008 मध्ये 'झी मराठी'च्या 'सा रे ग म प'च्या पर्वाची विजेती होती. आणि हाच तिच्या आयुष्याचा टर्निंग पाँईंट ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर हिंदी सारेगमपमध्येही आपल्या सुरांची मोहिनी तिने परीक्षकांसह प्रेक्षकांवरही घातली.वैशालीचा हा प्रवास खूपच खडतर राहिला आहे. आयुष्यात अनेक चढ-उचारांना तिला सामोरे जावे लागले आहे. अमरावतीतील खारे तळेगाव इथे वैशालीचा जन्म झाला आहे. बालपणी असलेल्या गरिबीमुळे तिला कायम संघर्ष करावा लागलेला आहे. मात्र, सारेगमपचं विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचं आयुष्य बदलले असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच वैशाली भैसने-माडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारीसुद्धा आहेत.