Marathi Film: हिंदी मालिकेचा पडद्या गाजवल्यानंतर 'या' अभिनेत्रीची मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनय बेर्डेसोबत शेअर करणार स्क्रीन

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 08, 2022 | 12:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tejaswi Prakash Marathi Film : 'बिग बॉस 15'ची (Big Boss 15 ) विजेती तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash ) लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हिंदी स्मॉल स्क्रीनवर ठसा उमटवल्यानंतर आता तेजस्वी प्रकाश आता मराठीत (Entry in Marathi film ) नशीब आजमावयाला सज्ज झाली आहे.

Naagin Fame Tejaswi Prakash to debut in Marathi film
तेजस्वी प्रकाशची मराठीत एन्ट्री  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'मन कस्तुरी रे' या मराठी सिनेमात झळकणार
  • अभिनेता अभिनय बेर्डेसोबत स्क्रीन शेअर करणार
  • येत्या 4 नोव्हेंबरला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार

Tejaswi Prakash Marathi Film : 'बिग बॉस 15'ची  (Big Boss 15 ) विजेती तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash ) लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हिंदी स्मॉल स्क्रीनवर ठसा उमटवल्यानंतर आता तेजस्वी प्रकाश आता मराठीत नशीब आजमावयाला सज्ज झाली आहे. अभिनय बेर्डेसोबत (Abhinay Berde ) ती मराठी सिनेमात झळकणार आहे. 'मन कस्तुरी रे' असं या सिनेमाचं नाव आहे. 

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे पाच नियम


याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, बिग बॉसने तेजस्वीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या शोमुळे ती खूप चर्चेत होती. करण कुंद्रासोबत असलेल्या अफेअरमुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरते. हिंदी मालिकांमध्ये नशीब आजमावल्यानंतर आता ती मराठीत आपली ओळख निर्माण करायला सज्ज झालेली आहे. याआधीही तेजस्वीने पोस्टर शेअर करत मराठी सिनेमात काम करणार असल्याचं सांगितलं होतं. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली आहे. 


मराठी अभिनेता अभिनय बेर्डेसोबत तेजस्वी स्क्रीन शेअर करणार आहे. एक स्टारकीड असूनही अभिनयने स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या या मुलाने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडलेली आहे. अभिनयने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. ' मन कस्तुरी रे' असं या सिनेमाचं नाव असून येत्या 4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाद्वारे तेजस्वी मराठीत पदार्पण करत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

अधिक वाचा :  आयफोन आणि अँड्रॉईड फोनच्या किंमतीत का असतो फरक?

संस्कार धरोहर अपनों की, स्वरागिनी, पहारेदार पिया की आणि सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकांमध्ये तेजस्वीने काम केलं आहे. मात्र, 'बिग बॉस 15'या रिएलिटी शोमुळे तेजस्वी प्रकाश हे नाव लाईमलाईटमध्ये आलं. ही मराठमोळी मुलगी घराघरात पोहोचली. मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणिटेलिकम्युनिकेशन्सचमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. तेजस्वी प्रकाशने वयाच्या 18 व्या वर्षापासूनच करिअरची सुरुवात केली. 2012 मध्ये आलेला '2612' या शोपासून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली. सध्या एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. आता तेजस्वीची ही मराठी इनिंग प्रेक्षकांना पसंत पडते का? तिच्या सिनेमाला प्रेक्षक कसा काय रिस्पॉन्स देतात हे सिनेमा 4 नोव्हेंबरला रिलीज झाल्यावर कळेलंच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी