Happy Birthday Special: बिग बींचा सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकाचा थक्क करणारा प्रवास

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 24, 2022 | 12:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Happy Birthday Nagraj Manjule : 'पिस्तुल्या' (Pistulya ) या लघुपटापासून सुरू झालेला नागराज मंजुळे (Nagraj Manjule ) यांचा हा प्रवास थेट बॉलिवूडच्या महानायकापर्यंत येऊन पोहोचलाय. झुंड या सिनेमात नागराज मंजुळे यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांनाच दिग्दर्शित केलेलं आहे. नागराज मंजुळे यांचा हा प्रवास खूपच खडतर होता असं स्वत: नागराज यांनी वारंवार आपल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे.

Nagraj Manjule birthday special Know their life journey till date
मराठी सिनेमा वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या दिग्दर्शकाचा वाढदिवस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज वाढदिवस
  • पिस्तुल्यापासून झुंडपर्यंतचा थक्क करणारा प्रवास
  • मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने श्रीमंत करणारा दिग्दर्शक

Nagraj Manjule Birthady Spl : नागराज मंजुळे (Nagraj Manjule ) म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो 'सैराट' (Sairat) सिनेमा. या सिनेमातील गाणी, आर्ची-परश्याची लव्हस्टोरी, सिनेमाची कथा सारं काही विलक्षणंच. सैराटने तुफान यश मिळवलं. हे यश इतकंमोठं होतं की बॉलिवूडनेही (Bollywood ) त्याची दखल घेतली. ज्याच्या त्याच्या तोंडी नागराज मंजुळे (Nagraj Manjule ) हे नाव होतं. या सिनेमाने नागराज यांना प्रसिद्धी तर मिळवून दिलीच, पण त्यांना एका वेगळ्याचं उंचीवर नेलं. आज नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. मात्र, सिनेसृष्टीतला त्यांचा हा प्रवास खूपच खडतर होता. ( Nagraj Manjule birthday special Know their life journey till date )

नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या करमााळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला. नागराज यांच्या घरची परिस्थिती तशी बिकटच होती. लहानपणापासूनच नागराज यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. मित्रांसोबत दप्तर पाठीवर घेऊन ते थेट सिनेमा पाहायला जायचे. सिनेमाचं वेड त्यांना लहानपणापासूनच होतं. हा किस्सा नागराज मंजुळे यांनी आपल्या आजवरच्या मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितलेला आहे. मात्र, घरातल्या अशा बिकट परिस्थितीतही नागराज यांनी पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ए आणि एम.फील.सुद्धा पूर्ण केलं. मात्र, त्यांच्यातल्या सिनेमाचं वेड त्यांना तेव्हाही स्वस्थ बसून देत नव्हतं. मास कम्युनिकेशनला त्यांनी अॅडमिशन घेतली. त्याच दरम्यान पिस्तुल्या या लघुपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे त्यांच्या लघुपटाने थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. मात्र, तरीही म्हणावी तशी त्यांची दखल सिनेसृष्टीने घेतली नव्हती.

अधिक वाचा : या पबमध्ये चकना घेणाराही होईल भिकारी

चित्रपट निर्मितीचं स्वप्न होतंच, मात्र त्यासाठी लागणारा पैसा हाता नव्हता. दरम्यान, त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. सिनेमाच्या ध्यासापायी त्यांनी रात्री वॉचमनची नोकरी केली. दिवसा लोकांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचं काम केलं. अनेक अडचणींचा सामना करत आज ते इथवर पोहोचले आहेत. पुण्यात शिकत असताना नागराज यांना त्यांच्या घरून डबा यायचा मात्र, काही दिवस त्यांचा डबा आलाच नाही. मित्रासोबत काही ना काही बनवून खाण्याचा सवय त्यामुळे त्यांना लागली. मात्र एक दिवस असा उजाडला की हा मित्रही गावी गेला आणि अखेर त्यांना शेंगदाणा मसाला आणि वडापावर त्यांना तब्बल 6 दिवस काढावे लागले होते. 

अधिक वाचा :  हरतालिका तीजला होतोय हा दुर्मिळ योग

पिस्तुल्यानंतर फॅण्ड्री हा जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा नागराज मंजुळे यांनी रुपेरी पडद्यावर आणला. या पहिल्याचं सिनेमासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये खूप गाजला. याच सिनेमाने त्यांना नवं लिहिण्याची प्रेरणा दिली आणि त्यानंतर अखेर 2016 साली सैराट ही भन्नाट कलाकृती 
घेऊन नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले. एकाही गाण्याचा समावेश नसलेलया फॅण्ड्री सिनेमानंतर सैराटमध्ये त्यांनी संगीताला विशेष महत्त्व दिलं. भारतातला सैराट हा पहिला सिनेमा आहे ज्यात सिम्फनी ऑर्केस्ट्राचा वापर करण्यात आला. अजय-अतुल यांचं संगीत, आर्ची-परश्याची लव्हस्टोरी असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून सैराटंच नाव घेतलं जातं. 

अधिक वाचा : ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळणार हॉरर वेबसीरिजची ट्रीट

मात्र, आपल्या कारकीर्दीत एकदा तरी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्यासोबत काम करायला मिळावं अशी प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शकाची इच्छा असते. सगळ्यांच्याच वाट्याला ते येतं असंही नाही. मात्र, नागराज मंजुळे यांच्या वाट्याला ते आलं आणि मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. झुंड या सिनेमात नागराज यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांनाच दिग्दर्शित केलं. मराठी सिनेमाचं रुपडंच या दिग्दर्शकाने पालटून टाकलं आणि मराठी सिनेसृष्टी खऱ्या अर्थाने श्रीमंत केली अशा या महान दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी