अभिनेत्री नेहा पेंडसेने भावी पतीला केलं KISS, शेअर केला फोटो 

मराठी पिक्चर बारी
Updated Jan 01, 2020 | 20:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neha Pendse kiss photo: मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस १२ची स्पर्धक नेहा पेंडसे ही सध्या तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. त्याच दरम्यान सोशल मीडियात नेहा पेंडसेचा एक किसिंग करतानाचा फोटो व्हायरल होत आहे.

neha pendse marathi actress shardul singh kissing photo entertainment news marathi google
अभिनेत्री नेहा पेंडसेने भावी पतीला केलं KISS, शेअर केला फोटो   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री नेहा पेंडसेचा किसिंग फोटो व्हायरल 
  • नेहा पेंडसेने इंस्टाग्रामवर शेअर केला रोमॅन्टिक फोटो 
  • भावी पती शार्दुलसोबतचा नेहा पेंडसेने शेअर केला फोटो 

मुंबई: बिग बॉस १२ ची स्पर्धक आणि मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या आपल्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. नेहा पेंडसे आपला बॉयफ्रेंड शार्दुल सिंह याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नाच्या विधी, परंपरा सुद्धा सुरु झाल्या आहेत. या विधीचे फोटोजही समोर आले आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसे आणि शार्दुल गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही ५ जानेवारी रोजी महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Because it’s the last single girl kiss - Carrie Bradshaw

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

याच दरम्यान अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपला भावी पती शार्दुल याच्यासोबत नववर्षाचं दणक्यात स्वागतही केलं. आता सोशल मीडियात नेहा पेंडसेने एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. नेहाने शेअर केलेल्या या फोटोत शार्दुलला नेहा लिपलॉक करताना दिसत आहे. नेहाने हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे बिझनेसमन शार्दुल सिंह याच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. दोधांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. या विधीचे फोटो व्हायरल झाले असून त्यात नेहाने साडी परिधान केल्याचं दिसत आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने हिंदी सीरिअल 'May I come in madam'मध्ये मुख्य भूमिका साकारत अनेकांची मने जिंकली. १९९० मध्ये दूरदर्शनवरील सीरिअलमधून नेहाने बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. टीव्ही सीरिअलसोबतच नेहाने मराठी आणि हिंदी सिनेमांतही भूमिका केल्या आहेत. नेहा लवकरच सिद्धार्थ मेनन सोबत मराठी सिनेमात एकत्र दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी