'राजी-नामा'त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

new web series rajinama on political drama in maharashtra will soon be available on ott platform : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यावरच आधारित राजीनामा ही नवी वेब सीरीज भेटीला येणार आहे.

new web series rajinama on political drama in maharashtra will soon be available on ott platform
'राजी-नामा'त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लवकरच 'राजीनामा' ही नवी वेब सीरीज येणार
  • अभिजित पानसे घेऊन येत आहेत राजीनामा वेब सीरीज
  • महाराष्ट्रातील राजकारणातील रंजक नाट्य आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

new web series rajinama on political drama in maharashtra will soon be available on ott platform : मुंबई: सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. 

वाचा : ठाकरे विरूद्ध शिंदे

प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत 'राजी-नामा'चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले असून वेबविश्व हादरून सोडणाऱ्या 'रानबाजार'नंतर अभिजित पानसे आणि 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ही जोडी पुन्हा एकदा 'राजीनामा'च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. 

प्रियम गांधी-मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारित 'राजी-नामा'ची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून आता लवकरच प्रेक्षकांना पुन्हा एकदा सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.

अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या 'रानबाजार'ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. 

यशोशिखरावर पोहोचलेल्या  'रानबाजार'मधील सत्तानाट्यानंतर आता 'राजी-नामा'मध्येही 'खुर्ची'साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात 2019 पासून अनेक राजकीय उलथापालथी सुरु आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडी एखाद्या सिनेमाच्या पटकथेप्रमाणेच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्यातील उत्कंठा लक्षात घेऊनच आता मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना यामधील अनेक गोष्टी खुणावत असून त्या मोठ्या पडद्यावर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच राजकीय नाट्य पाहण्यात प्रेक्षकांनाही नेहमीच आवडत आलं आहे. या सगळ्याचाच विचार करुन आचा नवनव्या कलाकृती आता समोर येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी