महेश मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप

दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांच्याविरोधात पुण्यातील यवत पोलीसस्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

Mahesh Manjrekar
महेश मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • काय आहे प्रकरण?
  • गाडीचे नुकसान झाल्याचा मांजरेकरांचा दावा
  • प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते आहेत महेश मांजरेकर

पुणे: दिग्दर्शक (Director) अभिनेते (actor) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरोधात पुण्यातील (Pune) यवत पोलीसस्थानकात (Yavat police station) अदखलपात्र गुन्हा (non-cognizable offence) नोंदवण्यात आला आहे. मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ (abuse) आणि मारहाण (beating) केल्याचे तक्रारदाराने (complainant) म्हटले आहे. तसेच महेश मांजरेकर यांनी पोलीसस्थानकात येण्यास नकार दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. शुक्रवारी म्हणजेच 15 जानेवारी रोजी घडलेली ही घटना आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून टेंभुर्णीला जाताना एक गाडी त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि त्या गाडीने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागे असलेली तक्रारदाराची गाडी समोरच्या गाडीला आदळली. यानंतर त्या गाडीतून महेश मांजरेकर आणि त्याचे साथीदार खाली उतरले आणि नुकसानभरपाईची मागणी करू लागले. यावेळी झालेल्या वादावादीत त्यांनी सदर तक्रारदाराला शिवीगाळ आणि मारहाणही केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

गाडीचे नुकसान झाल्याचा मांजरेकरांचा दावा

दरम्यान महेश मांजरेकर यांनी घटनेची आपली बाजू सांगताना म्हटले आहे की सदर तक्रारदाराच्या गाडीने त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. ते तिघेही दारू प्यायलेले होते. याबद्दल जाब विचारताच त्यांनी अरेरावी केली. त्यांना उशीर होत होता म्हणून ते घटनास्थळावरून निघून गेले. त्यांनी असेही म्हटले आहे की या धडकेमुळे त्यांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे नुकसान झाले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते आहेत महेश मांजरेकर

महेश मांजरेकर यांनी वास्तव, अस्तित्व आणि विरुद्ध यासारख्या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही शिक्षणाच्या आयचा घो, मातीच्या चुली यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनाव्यतिरिक्त त्यांनी हिंदीमध्ये स्लमडॉग मिलेनियर, रेडी, बॉडीगार्ड, ओह माय गॉड, बाजीराव मस्तानी, संजू या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातली त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गाजली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी