‘हाई झुमका वाली पोर’ना चक्कर मा पोरं व्हयनात वेडा; आहिराणी गाण्याने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

hai Jhumka Vali Por : अहिराणी भाषेतील हे गाणं सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग होतं आहे. इन्स्टाग्राम रिल्स असोत की युट्युब, फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटस यावर हेच गाणं ट्रेंड होत आहे. युट्युबवर तब्बल 20 मिलियनचाही टप्पा या गाण्यानं पार केला आहे. या गाण्याचे साऊंड रेकॉर्डिंग मास्टर समीर केएस यांनी केलं आहे.

People goes crazy on hai jhunka vali por song
‘हाई झुमका वाली पोर’ना चक्कर मा पोरं व्हयनात वेडा  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • मुख्य कलाकाराचे नाव विनोद कुमावत आणि राणी कुमावत आहे.
  • युट्युबवर तब्बल 20 मिलियनचाही टप्पा या गाण्यानं पार केला आहे.
  • एसकेएस ENTERTAINMENTS हे गाणे निर्मित केलं आहे.

नाशिक  : खानदेशात (Khandesh)बोलल्या जाणाऱ्या अहिराणी भाषेतील (Ahirani language)गाण्यानी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून आहिराणी भाषेचं महत्त्व या गाण्यांनी वाढवून दिलं आहे. या भाषेतील गाणे इतके लयबद्ध असतात की, त्याच वेड अख्या महाराष्ट्राला (Maharashtra) लागून जातं.  काही दिवसापूर्वीच युट्यूबवर प्रदर्शित झालेलं गाणं ‘हाई झुमका वाली पोर. (hai jhunka vali por)या गाण्याने मोजक्याच दिवसात प्रेक्षकाच्या मनात घर करत त्यांना हे गाणं म्हणण्यास भाग पाडलं आहे.   ( People goes crazy on hai jhunka vali por song, hit on youtube)

अधिक वाचा  : लैंगिक संबंध ठेवताना महिला खोटं का बोलतात?

अहिराणी भाषेतील हे गाणं सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग होतं आहे. इन्स्टाग्राम रिल्स असोत की युट्युब, फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटस यावर हेच गाणं ट्रेंड होत आहे. युट्युबवर तब्बल 20 मिलियनचाही टप्पा या गाण्यानं पार केला आहे. या गाण्याचे साऊंड रेकॉर्डिंग मास्टर समीर केएस यांनी केलं आहे. तर एसकेएस  ENTERTAINMENTS हे गाणे निर्मित केलं आहे. या गाण्याचे बोल विनोद कुमावत आणि भैया मोरे यांचे आहेत. तर भैया मोरे आणि अंजना बार्लेकर यांनी हे गाणे गायले आहे. 

अधिक वाचा  : जीवनात यश हवे तर कावळा, कोंबड्याचे 'हे' गुण करा आत्मसात

सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या गाण्याची चर्चा आहे.  इन्स्टाग्रामवर तब्बल 5 लाखाहून अधिक नेटिझन्सने यावर रिल्स बनवले आहेत. ज्यात सेलिब्रिटी पासून ते रिल्स स्टार्सचाही समावेश आहे. या गाण्याची कल्पना कशी सुचली. कोणते कलाकार यात आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत..

कोण आहेत कलाकार?

या गाण्यातील मुख्य कलाकाराचे नाव विनोद कुमावत आणि राणी कुमावत आहे. विनोद हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आहे. त्याचं  शिक्षण भातखंडी गावात झालेलं आहे. विनोद याला लहान पणापासूनच गाणे गायची, डान्स करण्याची आवड होती आणि तो खानदेश भागातील असल्यामुळे अहिराणी भाषेवर त्याची चांगली मजबूत पकड आहे. मात्र, चांगला प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे त्याला त्याची कला मांडता येत नव्हती. मात्र, टिकटॉक जेव्हा सुरू झालं त्यावेळेस त्याने आपल्या कलेला वाव दिला आणि अनेक व्हिडिओ केले.

अधिक वाचा  : Nashik Crimeराष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

व्हिडिओ बनवण्याबरोबर तो नाशिकमध्ये एका कंपनीतही काम करत होता. त्यानंतर त्याची भेट या गाण्यातील नायिका राणीशी भेट झाली. राणी ही सर्व सामान्य कुटुंबातील आहे. तिचे वडील रिक्षा चालवतात. तर आई शिवणकाम करून घरचा उदरनिर्वाह भागवते. राणीलाही डान्स आणि गाण्याची आवड आहे. दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी एकत्र व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. त्यापैकी ही एक कलाकृती आहे, ज्याने अनेकांना वेड लावलं आहे. कर म्हणं लगन या गाण्याप्रमाणे हाई  झुमक्या  वाली पोरं हे गाणं खूप व्हायरल झालं आहे. 

रस्त्यावर सापडलेल्या झुमक्यावरन सुचलं गाणं 

हे गाणं कसं सुचलं किंवा या गाण्याचा विषय कसा सुचला  याचा किस्सा खूप मजेदार आहे. एकदा विनोद आणि राणी दोघेही फोनवर बोलत होते. तेवढ्यात विनोदला जमिनीवर कानातील झुमका सापडला. ते हातात घेतल्यानंतर विनोदला गाण्याची लाईन सुचली "हाई झुमका वाली पोर' हाय नदी तडीले चालणी,नदी तडीले चालनी,मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी पेवाडे तीतडी चालनी.. अश्या ओळी बनत विनोदने हे गाणं तयार केलं आहे. या गाण्याचे पूर्ण व्हिडिओ शूटिंग नाशिक जवळील ओझर परिसरात झाले आहे, असे कलाकार विनोद कुमावत याने सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी