Prajakta Gaikwad : स्वराज्य रक्षक संभाजीनंतर प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) पुन्हा एकदा येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी डबिंगचं कामही सुरू झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्राजक्ताला येसूबाईच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. (Prajakta Gaikwad will be seen again in Yesubai role)
प्राजक्ता गायकवाडने मराठी टेलिव्हिजनवर स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून प्राजक्ताने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. मात्र, झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे प्राजक्ताला नवी ओळख मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईची भूमिका प्राजक्ताने साकारली होती. येसूबाई प्रेक्षकांना खूप आवडली होती. प्राजक्ताच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरला. मालिका संपली तरी प्राजक्ताने साकारलेली येसूबाईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे आणि आता पु्न्हा एकदा हीच येसूबाई प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा येसूबाईच्या भूमिकेत झळकणार आहे.
अधिक वाचा : तमन्ना भाटिया लग्नबंधनात अडकणार
येसूबाईच्या भूमिकेता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. आता पुन्हा एकदा प्राजक्ताच्या चाहत्यांना तिला येसूबाईच्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत 'पुन्हा एकदा.. तोच इतिहास.. तीच भूमिका' असं म्हटलं आहे. यावेळी तिने डबिंग करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती डायलॉग डबिंग करताना दिसत आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अधिक वाचा : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी रंगला राजकीय सामना
मात्र, हा सिनेमा असणार की नवी मालिका हे अद्याप कळलेलं नाही. मात्र, पुन्हा एकदा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबतच प्राजक्ता दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या पुढच्या भागात प्राजक्ता दिसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अमोल कोल्हे आणि येसूबाईच्या भूमिकेत प्राजक्ताला पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आई माझी काळुबाई या मालिकेतही दिसली होती. काही महिनेच तिने या मालिकेत काम केलं होतं. मात्र, मालिकेतील निर्मात्यांशी वाद झाल्याने तिने ही मालिका सोडली या मालिकेमुळे प्राजक्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.