Prajkta Mali :प्राजक्ता माळी म्हणते, "हे सगळंच स्वप्नवत आहे", कुणी काढला प्राजक्ताचा 'हा' फोटो ?

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 25, 2022 | 20:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prajakta Mali Post : मराठीतली नावाजलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी(Prajakta Mali). सध्या ती लंडनमध्ये (London) आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच कार्यरत असते. लंडनमधील सुंदर फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.

Prajakta Mali post photo clicked by vaibhav tatwawaadi
प्राजक्ता माळीची लंडनवारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लंडनमध्ये शूट करतेय प्राजक्ता माळी
  • लंडनमधील अनेक फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  • आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी प्राजक्ता माळी लंडनमध्ये आहे

Prajakta Mali Post : मराठीतली नावाजलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). सध्या ती लंडनमध्ये (London) आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच कार्यरत असते. लंडनमधील सुंदर फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. 

मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज या तिनही प्लॅटफॉर्मवर गाजलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). सोशल मीडियावर (Social media)  ती खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच लगेच व्हायरल होतात. गेले काही दिवस ती लंडनला शूट करतेय. तिच्या बरोबक संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे, आणि हृषिकेश जोशी अशी तगडी स्टारकास्ट आहे. शूटिंगनंतर हे सेलिब्रिटी परदेशात भटकंती करत आहेत. 

अधिक वाचा : तुम्ही मानसिकरित्या फिट आहात का?

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो विंडसरचा आहे. त्या फोटोत ती नदीच्या पुलावर उभी असलेली दिसत आहे. फोटो पोस्ट करत तिने म्हटलंय, "हे सगळं स्वप्नवत आहे". लंडनचे अनेक फोटो तिने शेअर केलेले आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो तिचा सहकलाकार वैभव तत्त्ववादीने क्लिक केलेला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. 

मध्यंतरी, प्राजक्ताने एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने लिहिले होते, मैं जहाँ रहूँ..मैं कहीं भी हूँ …तेरी याद साथ है ।" तिच्या या पोस्टवर लोकांनी तर्कवितर्क लावायलाही सुरूवात केली होती. मात्र, लगेचच खाली तिने लिहिलं आहे, (गैरसमज नसावा , प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय..) तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते मोठया प्रमाणात कमेंट्स करत असतात. 

अधिक वाचा : अभिज्ञा भावेची 'ती' पोस्ट चर्चेत


प्राजक्तालाही लंडनला जाऊन शूट करायची इच्छा होती, तिनं म्हटलं होतं, 'जवळपास अर्धी मराठी इंडस्ट्री लंडनला येऊन फिल्म शूट करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचाच होता. सरतेशेवटी मी इथे आहे.' सध्या ती लंडनमध्ये सिनेमाचं शूट करत आहे. मात्र, आता कुठल्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे, त्याबद्दल अजून कळलं नाहीय. पण ते लवकरच कळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी