'रात्रीस खेळ चाले'ची शेवंता आता दिसणार 'या' हिंदी सिनेमात

मराठी पिक्चर बारी
Updated Apr 19, 2019 | 14:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘रात्रीस खेळ चाले’ची शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणतेय सब कुशल मंगल.तिच्यासोबत सगळंच कुशल मंगल आहे कारण ती लवकरच हिंदी सिनेमात झळकणार आहे. नेमका कोणता सिनेमा आहे आणि तिच्या भूमिकेबद्दल घ्या जाणून

Ratris Khel Chale fame actress Apurva Nemlekar aka Shevanta is all set to foray into Hindi film Sab Kushal Mangal
शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर म्हणतेय ‘सब कुशल मंगल’  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेली अनेक वर्ष तशी अभिनयात फार कार्यरत नव्हती पण ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून शेवंता म्हणून तिची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री झाली आहे. प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालण्यास शेवंता म्हणून यशस्वी ठरलेली अपूर्वा आता हीच जादू हिंदी सिनेसृष्टीत ही चालवणार असं दिसतंय. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका सिनेमाचं पोस्टर नुकतंच शेअर केलं आहे. आणि त्यात ती म्हणते ‘सब कुशल मंगल’. आता हे ती म्हणतेय ते तिच्या सिनेमाबद्दल. हे शेअर केलेलं पोस्टर हे तिच्या आगामी हिंदी सिनेमाचं असून अपूर्वा त्यात एका महत्तवाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar Official (@apurva_nemlekar) on

तिच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आपली लाडकी शेवंता आता हिंदी सिनेमात झळकणार ह्याचा आनंद तिच्या चाहत्यांच्या कमेन्ट्स् मधून दिसून येत होता. अनेकांनी तिला शुभेच्छा तर दिल्याच शिवाय तिची भूमिका शेवंताप्रमाणेच असेल का असे प्रश्न ही विचारले त्यावर
खुद्द अपूर्वाने ही भूमिका अगदी वेगळी असणार असल्याचा रिप्लाय त्या कमेन्टसना दिला. त्यामुळे अपूर्वाला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी सगळेच फार उत्सुक आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ मुळे घराघरात पोहचलेली अपूर्वा आता या सिनेमातून अधिक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवेल हे काय वेगळं सांगायला नको.

‘सब कुशल मंगल’ या तिच्या हिंदी सिनेमात अपूर्वासोबत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल त्याचसोबत अभिनेत्री रिवा किशन, अभिनेत्री प्राची मनमोहन, अभिनेता साहील शिवराम हे सगळे सुद्धा सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतील. तर या सगळ्या तरूण कलकारांसोबत अक्षय खन्ना आणि सतीश कौशिक हे कसलेले अभिनेते सुद्धा दिसतील. या सिनेमाबद्दल या व्यतिरिक्त अधिक माहिती अद्याप तरी कळू शकलेली नाहीये.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#apurvanemlekar #shevanta #shevantalovers #Rkc2 #zeemarathiofficial #hazeleyes

A post shared by Apurva Nemlekar Official (@apurva_nemlekar) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Apurva Nemlekar Official (@apurva_nemlekar) on

अपूर्वा ही सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये फारंच बिझी असून या मालिकेतून या हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी कसा वेळ काढणार आहे ते पहावं लागले. कारण तिच्या मालिकेचं शूट कोकणात सुरु असून ती सध्या तिथेच शूट करण्यात बिझी आहे. हिंदी सिनेमात अपूर्वा दिसेल हे आता स्पष्ट झालं असलं आणि त्याची उत्सुक्ता वाढली असली तरी तिच्या शेवंताची जादू काही औरच आहे. आणि ती जादू कायम ठेवण्यात अपूर्वा कुठेही कमी पडत नाही आहे. त्यामुळे या हिंदी सिनेमाप्रमाणेच आणखी अनेक भूमिकांमध्ये अपूर्वा पुढे झळकेल सुद्धा पण तिच्या शेवंताने केलेली कमाल मनात कायम घर करुन राहील हे नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'रात्रीस खेळ चाले'ची शेवंता आता दिसणार 'या' हिंदी सिनेमात Description: ‘रात्रीस खेळ चाले’ची शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणतेय सब कुशल मंगल.तिच्यासोबत सगळंच कुशल मंगल आहे कारण ती लवकरच हिंदी सिनेमात झळकणार आहे. नेमका कोणता सिनेमा आहे आणि तिच्या भूमिकेबद्दल घ्या जाणून
Loading...
Loading...
Loading...