Marathi celebrities: सुबोध भावे ते सिध्दार्थ जाधव: मागील आठवड्यापर्यंत काय करत होते हे सेलिब्रिटी?

मराठी पिक्चर बारी
Updated Jul 28, 2020 | 17:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi celebrities: लॉकडाऊनच्या काळात अनेक मराठी सेलिब्रिटीज सोशल मीडियावर खूप सक्रीय होते. वाचा मागील आठवड्यापर्यंत काय करत होते सिध्दार्थ जाधव, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे आणि इतर सेलिब्रिटीज.

Subodh Bhave, Adinath Kothare, Siddharth Jadhav
सुबोध भावे, आदिनाथ कोठारे, सिध्दार्थ जाधव  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: लॉकडाऊन दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील बरेच सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह होते. अगदी मागील आठवड्यापर्यंत हे सेलिब्रिटी घरीच होते. पण या काळात त्यांनी नेमकं काय-काय केलं हे जाणून घ्यायचं असल्यास ही बातमी तुम्हाला नक्कीच पाहावील लागेल. अभिनेता सिध्दार्थ जाधव, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे आणि इतर सेलिब्रिटींनी फक्त घरी बसून न राहता या लॉकडाऊमधील वेळेचा देखील प्रमोशनासाठी उपयोग करुन घेतला आहे. सिध्दार्थ जाधवने आपल्या टाईम प्लीज या चित्रपटाचा वाढदिवस साजरा केला. तर सुबोध भावेने आपल्या जाहिरातीबद्दल चाहत्यांची फिरकी घेतली. जाणून घ्या  सेलिब्रिटीज मागील आठवड्यापर्यंत नेमकं काय-काय केलं.

सिध्दार्थ जाधव

सिध्दार्थ जाधवने त्याच्या टाईम प्लीज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सात वर्षे साजरी केली. हा चित्रपट 26 जुलै 2013 रोजी प्रदर्शित झाला होता आणि यात प्रिया बापट, सिध्दार्थ जाधव, उमेश कामत, सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

सिध्दार्थ जाधवने आपल्या मुलीसोबत मजा-मस्ती करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्याने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ''Enjoy the moment " आपल्या आसपास कितीही नकारात्मकता असली तरी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा शोधावा हे माझ्या मुलींकडून मी शिकतोय... 

सुबोध भावे

लॉकडाऊनच्या काळात सुबोध भावेने जवळपास पाच महिन्यांनंतर एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या सेटवरून एक सेल्फी शेअर केला आणि लिहिले, '५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पहिल्यांदा एका जाहिरातीच चित्रीकरण केलं. (जाहिरात काही दिवसात येईलच) अर्थात सर्व प्रकारची काळजी घेऊन, मोरया.'

आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या आगामी मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले असून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे याचे सहनिर्माते आहेत. त्याने 26 जुलै रोजी पिता आणि मुलामधील संवादाची एक सुंदर पोस्ट शेअर करत पालक दिनही साजरा केला. त्याने लिहिले, 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#जीज़ाआणिडॅडा #parentsday

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने नुकताच एक टीजर शेअर करत‘खिडकीच्या पल्याड’या तिच्या नव्या गाण्याच्या प्रदर्शनाची घोषणा केली. हे गाणे यूट्यूबसह अनेक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. सोनालीने यावेळी गाणे प्रदर्शित झालेल्या इतर प्लॅटफॉर्मबद्दल सांगितले. खिडकीच्या पल्याड’या गाण्याची एक क्लिप शेअर करत तिने लिहिले.

ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवे ही ऑनलाईन माझा थिएटरवरच्या तिच्या मूकाभिनयामुळे सध्या चर्चेत आहे. सवाल जवाब सादर करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याची बातमी तिने शेअर केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी