Riteish Deshmukh Movie Ved: 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण...', रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमाचं पोस्टर रिलीज

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 26, 2022 | 16:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Riteish Deshmukh Movie Ved: अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) त्याच्या आगामी 'वेड' (Ved) या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलेलं आहे. दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत रितेशने सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. त्याचप्रमाणे रितेशचा हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Movie Ved  first look released
रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमाचं पोस्टर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रितेश देशमुखच्या आगामी 'वेड' सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हील
  • 'वेड' सिनेमाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शनात करणार पदार्पण
  • जेनिलिया देशमुखचे 'वेड' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

Riteish Deshmukh Movie Ved: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) त्याच्या आगामी वेड (Ved) या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलेलं आहे. या सिनेमातून रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमात रितेश आणि जेनेलिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून रितेश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या पोस्टरमध्ये त्याच्यासोबत जेनेलिया देशमुखही (Genelia Deshmukh) दिसत आहे. (Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Movie Ved  first look released)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अधिक वाचा : राम सेतू सिनेमाचे फर्स्ट डे कलेक्शन


रितेश देशमुखने शेअर केली पोस्ट

रितेशने सोशल मीडियावर त्याच्या या सिनेमाचं पोस्टर शेअर केलेलं आहे. पोस्ट शेअर करत रितेश म्हणतोय, "वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

हातात सिगारेट आणि भेदक नजर असं या सिनेमाचं पोस्टर पाहता हा सिनेमा थ्रीलर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ही एक लव्हस्टोरीही असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टर रिलीज करताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं कमेंट्सवरून दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

20 वर्ष रितेशने अभिनयक्षेत्रात कारकीर्द गाजवली आहे. रितेशने अनेक उत्तम सिनेमा बॉलिवूडला दिलेले आहेत. त्याची ही कारकीर्द केवळ बॉलिवूडपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर 'लय भारी' या सिनेमाच्या माध्यमातून रितेशने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर आता या सिनेमाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करत आहे तर अभिनेत्री जेनिलिया देशमुख या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जेनेलियाने तामिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि तेलुगु या 5 भाषांमध्ये काम केलेलं आहे. 
अजय-अतुल यांनी सिनेमातील गाण्यांना संगीत दिलेलं आहे. 

अधिक वाचा :  आजपासून 24 दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक

सलमान खान साकारणार भूमिका

बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खान या सिनेमात एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. रितेशने सलमानसोबतचे सेटवरचे फोटोही शेअर केले होते.

याआधीही सलमानने रितेश देशमुखच्या 'लय भारी' सिनेमात गेस्ट अपिअरन्स दिला होता. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखचा हा 'वेड' 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी