या मराठी कलाकारांना झाला कोरोना, रिअॅलिटी शोचे शूटिंग थांबवले

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 02, 2020 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

corona in marathi industry: कोरोनाने आता मराठी इंडस्ट्रीमध्येही शिरकाव केला आहे. यामुळे एका मराठी रिअॅलिटी शोचे शूटिंगही थांबवले. 

coron
या मराठी कलाकारांना झाला कोरोना, रिअॅलिटी शोचे शूटिंग थांबवल 

थोडं पण कामाचं

  • मराठी कलाकारांना कोरोनाची लागण
  • भिनेता अभिजीत केळकर, जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांनाही कोरोनाची लागण
  • ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: अभिनेता सुबोध भावेला नुकतीच कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता आणखी तीन मराठी कलाकारांना  कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सुबोध भावेने ट्विटरवरून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता अभिनेता अभिजीत केळकर, जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे मराठी रिअॅलिटी शोचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. सिंगिंग स्टार या शोचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या सेटवर एकूण ६ जणांन कोरोनाची लागण झाल्याने शूटिंग १० सप्टेंबरपर्यंत थांबवण्यात आले. 

अभिजीत केळकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट टाकत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. 

काय म्हटलं अभिजीतने

नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली... माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती... डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे... माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद...

रोहित राऊतलाही झाली होती कोरोनाची लागण

रोहित राऊतलाही कोरोनाची लागण झाली होती. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर आपण बरे असल्याची माहिती दिली आहे. १७ ऑगस्टला कोरोना झाल्याचे समोर आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी