सई-अमेय च्या 'गर्लफ्रेंड' चा वर्ल्ड प्रीमियर शेमारू मराठीबाणावर 

 व्हॅलेंटाईन्स डे जवळ येतोय, या निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी आजपासून सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे

SAI TAMHANKAR and amey wagh's girl firend film world premier on shamaroo
सई-अमेय च्या 'गर्लफ्रेंड' चा वर्ल्ड प्रीमियर शेमारू मराठीबाण 

थोडं पण कामाचं

  • 'व्हॅलेंटाईन्स-डे' ला शेमारू मराठीबाणावर जगावेगळ्या लव्हस्टोरीचा आनंद घ्या

मुंबई : व्हॅलेंटाईन्स डे जवळ येतोय, या निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी आजपासून सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  या रोमांचक सिनेमांच्या यादीतील सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर! १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता तुमच्या भेटीला येणार 'गर्लफ्रेंड' फक्त शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर!  'प्यारवाली लव्ह स्टोरी', 'बस स्टॉप', 'फोटोकॉपी', 'यंटम', 'लग्न मुबारक', 'मितवा' आणि अशा अनेक मनोरंजक चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे.

गर्लफ्रेंड मिळवण्याच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या नचिकेतच्या आयुष्यात गर्लफ्रेंड नसणे हा सर्वात ऐरणीचा मुद्दा ठरलाय. यावर तो एक नामी युक्ती करतो, अलिशा नावाची सुंदर तरुणी आपली गर्लफ्रेंड असल्याची बतावणी तो करू लागतो. नचिकेतला एरव्ही ज्याचे खूप आकर्षण वाटत असते तो परिकथेतील रोमान्स त्याच्या जीवनात प्रत्यक्ष येतो तेव्हा मात्र त्याची अवस्था बिकट होऊन जाते.  नचिकेतला त्याच्या स्वप्नांची राणी खरोखरीच मिळणार की त्याच्या एरव्ही सुरळीत चाललेल्या साध्या आयुष्यात वादळ निर्माण होणार? या आगळ्यावेगळ्या ‘गर्लफ्रेंड’चे नेमके काय होणार हे पाहण्यासाठी शेमारू एंटरटेनमेंटवर हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहायला विसरू नका.

मराठीतील सुपरस्टार सई ताम्हणकरने हा सिनेमा शेमारू मराठीबाणावर दाखवला जाणार असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, "गर्लफ्रेंड हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय जवळचा आहे.  या सिनेमाच्या सेटवर प्रेम, आपलेपणा आणि मौजमजा यांची भरपूर रेलचेल होती. यंदा व्हॅलेंटाइन्स डे ला शेमारू मराठीबाणावर याचा प्रीमियर होत आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. मला खात्री आहे की दर्शकांना देखील हा सिनेमा खूप आनंद मिळवून देईल."  

लोकप्रिय आणि गुणी अभिनेता अमेय वाघने सांगितले, "गर्लफ्रेंड हा असा सिनेमा आहे ज्यातील भूमिका साकारताना माझ्यातील अभिनेत्याचा कस लागला. थिएटर्समध्ये दर्शकांनी या सिनेमाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे ही मेहनत सार्थकी लागली. टीव्हीवरील आमच्या दर्शकांसाठी शेमारू मराठीबाणाने गर्लफ्रेंडचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आयोजित केला आहे हे ऐकून मला खूपच छान वाटले. माझी पक्की खात्री आहे की या गर्लफ्रेंडसोबत माझा आणि माझ्या दर्शकांचा व्हॅलेंटाइन्स डे मस्त मजेत जाईल."

शेमारू मराठीबाणा वाहिनी आपल्या दर्शकांसाठी सिनेमांची निवड नेहमीच अतिशय चोखंदळपणे करत असते.  व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा सिनेमा नक्की बघा आणि भरपूर मजा करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी