Sayali patil : मी त्यांना अभिनेते म्हणून नाही पाहिलं, तर... ; सायली पाटीलनं सांगितला बिग बीसोबतचा अनुभव

Sayali patil : अभिनेत्री सायली पाटील 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. मात्र त्यापूर्वी तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला

ayali patil experience of with Big B
Sayali patil : मी त्यांना अभिनेते म्हणून नाही पाहिलं, तर... ;  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची प्रचंड चर्चा.
  • सायलीने यापूर्वी आकाशसोबत 'झुंड' या चित्रपटातही काम केलं आहे.
  • अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे तिने सांगितलं.

Ghar Banduk Biryani Actress Sayali:मुंबई :  सोशल मीडियावर ( Social media)) 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे.  या चित्रपटात दिग्दर्शक (Director) नागराज मंजुळे(Nagaraj Manjule),अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांच्यासह अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) आणि अभिनेत्री (actress) सायली पाटील दिसणार आहे. घर बंदूक बिरयानी' मुळे सायलीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचं प्रमोशन देखील जोरात केलं जात आहे.  यानिमित्त सायली पाटील हिने एक माध्यमाला मुलाखत दिली. यात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं.   (I didn't see him as an actor, but...;Sayali patil experience of with Big B)

अधिक वाचा  :  उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं
सायलीने यापूर्वी आकाशसोबत 'झुंड' या चित्रपटातही काम केलं आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत 'झुंड' चित्रपटाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. शुटिंग दरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांचं  सेटवरच वागणं बोलणं कसं होतं याबद्दलही तिने सांगितलं. सायलीने नुकतीच एका वेबसाइटला मुलाखत दिली. तेव्हा बोलताना ती बिग बींबद्दल भरभरून बोलत होती. मुलाखतीत बोलताना सायली म्हणाली की, बिग बी अमिताभ बच्चन  हे मला एका विशेष नावाने हाक मारायचे. सायली पुढे म्हणाली, 'सुरुवातीला मला हे सगळं खोटं वाटत होतं की अमिताभ बच्चन सर हे पण या चित्रपटात असतील असं. 

अधिक वाचा  : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड

पण एके दिवशी ते स्वतः सेटवर आले आणि त्यांना समोर बघून मला विश्वास बसत नव्हता. मी स्वतःला चिमटापण काढला. आमची फुटबॉलची मॅच होती. त्यांना माहीत होतं मला खेळता येत नाही या सगळ्यांना खेळता येतं. ते इतके समजून घ्यायचे. मला मोहतरमा म्हणायचे ते. बाकी जास्त मुली नव्हत्या सेटवर. त्यात माझ्यावर लक्ष असायचं त्यांचं. मी कुठेही उन्हात गेले की मला लांबूनच हाक मारून म्हणायचे 'मोहतरमा, धूप हैं क्या कर रहे है' एवढे समजून घेणारे कसे असू शकतात म्हणजे खूप छान आणि शांत. यो केलं की ते पण यो म्हणायचे. त्याचं तिथे असणंच खूप भारी होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Sayli Patil (@sayliipatil)

'मी त्यांना अभिनेते म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पाहिलं. त्यांच्यासोबत काम करताना मुळीच दडपण आलं नाही. त्यांनी येऊच दिलं नाही. तो एक माणूस सेटवर असला की तिथलं वातावरणच बदलून जायचं. त्यांचं प्रत्येक माणसाकडे बारीक लक्ष होतं. अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकण्यासारखं तर प्रचंड होतं, सायली म्हणाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी