'झिम्मा' सिनेमातील सायलीच्या बोल्ड लूकची चर्चा

Sayali Sanjeev bold look in Jhimma Marathi movie सोज्ज्वळ दिसणारी सायली संजीव 'झिम्मा' सिनेमात नव्या भूमिकेत. सिनेमाच्या ट्रेलरच्या निमित्ताने पहिल्यांदाच सायलीचा बोल्ड लूक प्रदर्शित.

Sayali Sanjeev bold look in Jhimma Marathi movie
'झिम्मा' सिनेमातील सायलीच्या बोल्ड लूकची चर्चा 

थोडं पण कामाचं

  • 'झिम्मा' सिनेमातील सायलीच्या बोल्ड लूकची चर्चा
  • सोज्ज्वळ दिसणारी सायली संजीव 'झिम्मा' सिनेमात नव्या भूमिकेत
  • सिनेमाच्या ट्रेलरच्या निमित्ताने पहिल्यांदाच सायलीचा बोल्ड लूक प्रदर्शित

मुंबईः पोलीस लाइन - 'पोलिस लाईन', 'आटपाडी नाईट्स', 'मन फकीरा', 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी' या सिनेमांतून तसेच 'काहे दिया परदेस', 'परफेक्ट पती', 'गुलमोहर', 'शुभमंगल ऑनलाईन' अशा निवडक टीव्ही मालिकांतून चमकलेली सोज्ज्वळ दिसणारी सायली संजीव (सायली संजीव चांदसरकर) 'झिम्मा' सिनेमात नव्या भूमिकेत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरच्या निमित्ताने पहिल्यांदाच सायलीचा बोल्ड लूक प्रदर्शित झाला. (Jhimma Marathi movie scheduled to be released on 23 Apr 2021, Sayali Sanjeev bold look in Jhimma Marathi movie)

सायली संजीव ही मूळची धुळे जिल्ह्यातील आहे, तिचे शिक्षण नाशिक जिल्ह्यात झाले. ती अल्पावधीत मनोरंजनसृष्टीत एक सोज्ज्वळ कलाकार म्हणून लोकप्रिय झाली. याच कारणामुळे सायलीच्या 'झिम्मा' सिनेमाच्या ट्रेलरमधील बोल्ड लूकची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव हे कलाकार आहेत. हा सिनेमा २३ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात एक ट्रॅव्हल कंपनीचा टूर गाइड म्हणून सिद्धार्थ चांदेकर महिलांच्या टीमसोबत इंग्लंडसह युरोपमधील प्रमुख देशांच्या ट्रिपवर जाणार आहे.

नुकताच 'झिम्मा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सायलीचा बोल्ड लूक दिसत आहे. सायली आंघोळ करतानाचे एक दृश्य ट्रेलरमध्ये आहे. मनोरंजनसृष्टीत एक सोज्ज्वळ कलाकार म्हणून लोकप्रिय झालेल्या सायलीच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

याआधी काही वर्षांपूर्वी 'टूरटूर' नावाचे एक मराठी नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. या नाटकात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांच्या पत्नी सहलीला जातात अशी कल्पना होती. हे विनोदी नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. या 'टूरटूर'वरुन प्रेरणा घेऊन तयार केलेल्या 'झिम्मा' सिनेमात सहलीच्या निमित्ताने महिलांच्या स्वातंत्र्यावर चर्चा झाली आहे. महिलांसमोरची आव्हाने आणि ही आव्हाने हाताळण्यासाठी त्यांनी केलेला विचार सिनेमातून खुमासदार पद्धतीने मांडण्यात आला आहे.

मनोरंजनसृष्टीला चांगल्या दिवसांची आशा

कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मनोरंजनसृष्टीला मोठा फटका बसला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नव्या वर्षात परिस्थिती सुधारेल अशी आशा करत असतानाच कोरोनाचे नवे अवतार धुमाकूळ घालू लागले. यामुळे पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीला चिंता सतावू लागली आहे.

जवळपास सात महिने देशातली थिएटर बंद होती. थिएटर आणि मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू झाली तरी अद्याप प्रेक्षकांची पावले मोठ्या पडदयाकडे वळलेली नाही. जास्त प्रेक्षक येत नसल्यामुळे सिनेमांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहे. मोठ्या पडद्याअभावी मनोरंजनसृष्टीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तिकीट विक्रीतून होणारे उत्पन्न घटल्यामुळे मनोरंजनसृष्टीची आर्थिक कोंडी झाली. पीव्हीआर सारख्या बलाढ्य मल्टिप्लेक्स कंपनीला २०१९ मध्ये ४८ कोटींचा नफा आणि २०२० मध्ये १८४ कोटींचा तोटा झाला. 

निर्मात्यांचे नुकसान होऊ लागल्यामुळे अनेक मोठ्या कलाकारांनी सिनेमासाठी मोठी रक्कम मागणे थांबवले आहे. त्यांनी परिस्थिती बघून स्वतःसाठी मागत असलेले पैसे कमी करायला सुरुवात केली आहे. लसीकरणातून कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले तर पुढील वर्षभरात परिस्थिती हळू हळू सावरेल, अशी आशा मनोरंजनसृष्टीला वाटत आहे. पण मागील काही दिवसांत हळू हळू चित्रपट प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आणि मनोरंजनसृष्टीला नव्याने चांगल्या दिवसांची आशा वाटू लागली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी