[VIDEO] पाहा CAA विरोधात चालू असलेल्या आंदोलनाबाबत आर्ची काय म्हणाली!  

Rinku Rajguru: देशभरात सीएए विरोधात आंदोलन सुरु असून याबाबत अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला विचारण्यात आलं. पाहा त्यावर रिंकू नेमकं काय म्हणाली.

see video what actress rinku rajguru aka archie said about the ongoing protest against the caa
[VIDEO] पाहा CAA विरोधात चालू असलेल्या आंदोलनाबाबत आर्ची काय म्हणाली!    |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पाहा सीएए आंदोलनाबाबत अभिनेत्री रिंकू राजगुरू काय म्हणाली
  • मी कोणाला सल्ले देत नाही आणि कुणाचे सल्ले घेतही नाही: रिंकू
  • रिंकूचा आगामी सिनेमा मेकअप लवकरच होणार प्रदर्शित

अहमदनगर: सध्या महाराष्ट्रसह देशभर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)विरोधात सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सैराट सिनेमातून प्रत्येकाच्या मनात घर केलेल्या रिंकू राजगुरू हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

अभिनेत्री रिंकु राजगुरू ही तिचा आगामी सिनेमा 'मेकअप'च्या प्रमोशनसाठी अहमदनगरमध्ये आली होती. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तिला CAA विरोधात होत असलेल्या आंदोलनासंदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रिंकू म्हणाली की, 'सगळ्यांनी इतके चांगले वागायला पाहिजे की हे सर्व करायची गरजच पडायला नको.'  

दरम्यान, काही कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कधीकधी वादग्रस्त वक्तव्य देखील करत असतात. तर काही जण देशात सुरु असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होतात. हे योग्य आहे?  यावर बोलताना रिंकू म्हणाली की, 'कुणी कुठे जावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मी कुणाचे सल्ले घेतही नाही आणि कुणाल सल्ले देत देखील नाही. माझं बीएचं शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु आहे. जर मला चांगले चित्रपट ऑफर झाले तर मी ते स्वीकारते देखील.' अशी प्रतिक्रिया रिंकू राजगुरू हिने दिली आहे.

पाहा रिंकू नेमकं काय म्हणाली:

 

रिंकु राजगुरू हिचा आगामी चित्रपट मेकअप लवकरच प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यावर अनेकांनी चांगला प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

'मेकअप'च्या ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू (पूर्वी) पाहायला मिळते. पण दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना देखील ती दिसून येतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण, मेकअप'वाली पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीचा हा मेकअप कशासाठी आहे? असा विचार करायला लावणारा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरवरुन एक गोष्ट लक्षात येते की, या   चित्रपटात धमाल मस्तीसोबत बरेच ट्विस्टही पाहायला मिळणार आहेत. पण हे ट्वीस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा राजकुमार येणार का? या सगळ्याची उत्तरं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी