अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासलं, आईसाठी अजिंक्य यांनी ट्वीट करुन प्रार्थना करण्याचं केलं आवाहन

Seema Deo suffering from Alzheimer: प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासलं असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री सीमा देव यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य यांनी ट्वीट करत या बाबत माहिती दिली आहे.

Actress Seema Deo
अभिनेत्री सीमा देव (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर आजाराने ग्रासलं 
  • मुलगा अजिंक्य यांनी ट्वीट करुन दिली माहिती
  • अभिनेत्री सीमा देव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं प्रेक्षकांना केलं आवाहन

Seema Deo: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांना अल्झायमर आजाराने (Alzheimer) ग्रासलं आहे. अल्झायमर आजारामुळे अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. सीमा देव या केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनेत्री सीमा देव यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य (Ajinkya Deo) यांनी ट्वीट करत या बाबत माहिती दिली आहे.

अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्वीट करत म्हटलं, "माझी आई श्रीमती सीमा देव या अल्झायमर आजाराने ग्रस्त आहेत. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. तिच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व चाहत्यांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करावी". अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्वीट करुन आपल्या आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे.

अभिनेत्री सीमा देव या मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेलं आणि प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री सीमा देव यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी सिनेमांमध्ये भूमिका केली आहे. सीमा देव यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्यांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. सीमा देव यांनी आपल्या कारकिर्दीत ८० हून अधिक सिनेमांमध्ये भूमिका केली आहे. मराठी सिनेमा सर्जा आणि हिंदीतील आनंद हा सिनेमा त्यांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी आहेत.

अल्झायमर आजार काय असतो

अल्झायमर हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मनुष्याची स्मृती कमी होते आणि विसरभोळेपणा येण्यास सुरुवात होते. कधीकधी हे प्रमाण इतके वाढते की, त्यात मनुष्य आपल्या जवळच्या व्यक्तींनाही ओळख नाही तसेच त्या रुग्णाचे मानसिक संतुलनही बघडत जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी