Siddharth chandekar : अभिनयानंतर आता गाणं गाताना दिसणार 'हा' Handsome अभिनेता, शेअर केली पोस्ट

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 29, 2022 | 19:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Siddharth chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर (Social Media) तो नेहमीच फोटोंना काही ना काही भन्नाट कॅप्शन देत चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आताही त्याची पोस्ट सोशल मीडियावर खूपच गाजतेय. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Siddharth chandekar new post rap song upcoming movie
'हा' अभिनेता आता गाणार रॅप साँग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'हा' अभिनेता आता गाणार रॅप साँग
  • सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
  • लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'CONGRATULATIONS' सिनेमात प्रमुख भूमिकेत

Siddharth chandekar : सिनेमांमध्ये प्रयोग करणे, वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमा करणे हे मराठी इंडस्ट्रीत नेहमीच सुरू असते. वेगवेगळे प्रयोग करतानाच आपला सिनेमा प्रेक्षकांना आवडावा यासाठी कलाकार, दिग्दर्शकही तेवढीत मेहनत घेताना दिसत आहेत. त्यातलच एक नाव म्हणजे मराठी इंडस्ट्रीतला यंग आणि डॅशिंग अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar). सिनेमातला सहज वावर,आणि आपल्या अभिनयकौशल्याने त्याने नेहमीच आपली दखल घेण्यास साऱ्यांना भाग पाडले आहे. सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. एका वेगळ्याच भूमिकेतून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Siddharth chandekar new post rap song upcoming movie)

अधिक वाचा : टाइम्स म्झुझिकचे 'व्हॉट द लक' Rocking Party Song आऊट

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या आगामी सिनेमाविषयी माहिती देणारी ही पोस्ट सिद्धार्थने शेअर केलेली आहे. यावेळी तो एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ स्टुडिओमध्ये गाताना दिसत आहे. त्याच्या आगामी सिनेमात तो एक रॅप साँग गाताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिद्धार्थने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'Bring it on.. lets do this. आरं नाय माझ्याकडं लॉकेट अन नाय भारीतली कॅप, तरी स्टाईल मारत छाती ठोकून गातोय मी हे रॅप. Coming soon..'अशी पोस्ट त्याने शेअर केलेली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

फोटोमधील सिद्धार्थचा आवेश पाहूनच हे रॅप साँग असणार हे सूज्ञ प्रेक्षकांना सांगण्याची गरजच नाही. या पोस्टमध्ये त्याने गायक-संगीतकार रोहित राऊतचेही आभार मानले आहेत. त्याशिवाय #congratulations असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलंय यावरूनच हे गाणं त्याच्या आगामी congratulations सिनेमातील असल्याचंही म्हटलं जातंय. 

अधिक वाचा : अभिनयाप्रमाणेच luxury lifeसाठी ओळखला जातो 'हा' अभिनेता

लोकेश गुप्ते दिग्दर्शित congratulations या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू होतं. त्या सिनेमाचं शूटिंग आटोपून तो भारतात परतला आहे. 'CONGRATULATIONS' सिनेमात सिद्धार्थसोबत अलका कुबल आणि पूजा सावंत झळकणार आहे. या सिनेमाची स्टारकास्ट आणि कलाकारांनी केलेली धमाल पाहून सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता दिसून येत आहे. मात्र, सिनेमाच्या कथानकाबद्दल उत्सुकता अजूनही कायम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी