मुक्ता बर्वे-ललित प्रभाकर या हटके जोडीच्या स्माईल प्लिज सिनेमाचं पहिलं टीझर

मराठी पिक्चर बारी
Updated Jun 11, 2019 | 18:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Smile Please Teaser Released: मुक्ता बर्वे-ललित प्रभावर या हटके जोडीच्या स्माईल प्लिज सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज केलं गेलं. आता या सिनेमाचा पहिला वहिला टीझर सुद्धा भेटीला आलाय. पाहा या सिनेमाची पहिली झलक.

Smile Please new teaser look
मुक्ता बर्वे-ललित प्रभाकर या हटके जोडीच्या स्माईल प्लिज सिनेमाचं पहिलं वहिलं टीझर भेटीला  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: मुक्ता बर्वे एखाद्या सिनेमात असेल तर त्या सिनेमावर तिच्या अभिनयाची वेगळीच छाप असणार हे काय वेगळं सांगायला लागत नाही. त्यामुळे तिचा एखादा सिनेमा जाहीर होताच त्याची उत्सुकता आपोआपच वाढलेली असते. असंच झालं जेव्हा स्माईल प्लिज हा तिचा सिनेमा जाहीर केला गेला. त्यात हृदयांतरनंतर विक्रम फडणीस आणि मुक्ता ही दिग्दर्शक अभिनेत्रीची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्यानं सिनेमाबद्दल वेगळी उत्सुकता सुद्धा आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर खुद्द रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याचं अनाववरण केलं. आता या सिनेमाचा पहिला टीझर भेटीला आला आहे आणि सिनेमाची पहिली झलक यातून प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.

सिनेमाचं पोस्टर जिथे रितेशने शेअर केलं तिथे सिनेमाचा टीझर खुद्द करण जोहरने ट्विट केला आहे. त्याने टीझर शेअर करत खास मित्र विक्रमला आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच हा टीझर इतर सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा बराच गाजत आहे. मुक्ता बर्वे त्यात तिला ललित प्रभाकर या फ्रेश चेहऱ्याची साथ लाभणार आहे. शिवाय सिनेमात प्रसाद ओक याची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे, बऱ्याच दिवसांनी अदिती गोवित्रीकर मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. त्यात टीझरमध्ये सिनेमाचा विषय अगदी आगळा-वेगळा असेल हे समोर येतं. त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच ताणली गेली आहे.

 

 

सिनेमात मुक्ता व्यवसायाने फोटोग्राफर म्हणून दिसणार असून सिनेमाच्या टीझरमध्ये त्याची झलक पाहायला दिसते. त्यातून समोर येतं की मुक्ता निभावत असलेल्या कॅरेक्टरच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडायला लागतात ज्यामुळे तिचे आयुष्य बदलू लागते. याच वळणावर तिच्या आयुष्यात नवीन उमेद बनून येतो तो ललित प्रभाकर. ''जगात इतकं मोठं काहीच नाही, की ज्याच्यासमोर आपण हार मानावी'', असा प्रेरणादायी सल्ला देत, तिला प्रतिकूल परिस्थितीत तो साथ देताना दिसतो.  तर दुसरीकडे प्रसाद ओक जितका हळवा तितकाच तापटही दिसत आहे.

हृदयांतर या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणीस यांचा हा दुसरा मराठी सिनेमा असेल. सिनेमाच्या मुहुर्ताची क्लॅप बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिकने दिल्याने सिनेमाची चर्चा अगदी पहिल्या क्लॅपपासूनच सुरू झाली. विक्रम यांच्या या सिनेमात सुद्धा हृतिक कॅमिओ रोलमध्ये झळकणार का याबद्दलची सुद्धा बरीच उत्सुकता आहे. त्यामुळे एकंदरीत अनेक गोष्टींमुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी जीवनाची पुनर्मांडणी करण्यास शिकवणारा या स्माईल प्लीज सिनेमाचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या १९ जुलैची वाट पाहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुक्ता बर्वे-ललित प्रभाकर या हटके जोडीच्या स्माईल प्लिज सिनेमाचं पहिलं टीझर Description: Smile Please Teaser Released: मुक्ता बर्वे-ललित प्रभावर या हटके जोडीच्या स्माईल प्लिज सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज केलं गेलं. आता या सिनेमाचा पहिला वहिला टीझर सुद्धा भेटीला आलाय. पाहा या सिनेमाची पहिली झलक.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles