किंग खानच्या उपस्थितीत स्माईल प्लीज सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा

मराठी पिक्चर बारी
Updated Jun 27, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shahrukh unveils Music-Trailer of Smile Please: विक्रम फडणीस दिग्दर्शित स्माईल प्लीझ सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. त्याला उपस्थिती लाभली बॉलिवूडच्या किंग खान शाहरूखची. वाचा सविस्तर.

Smile Please trailer launch event in presence of Shahrukh Khan
किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत स्माईल प्लिज सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा 

मुंबई: मुक्ता बर्वे-ललित प्रभाकर या अनोख्या जोडीचा स्माईल प्लीझ सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा मराठी सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च सोहळा एकदम दिमाखदार पद्धतीनं नुकताच मुंबईत रंगला. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची. शाहरूख सोहळ्याला हजर होताच सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते. शाहरूखचा लेदर जॅकेट लूक त्यावर काळा गॉगल कहर करत होता. शाहरूख आला आणि विक्रम फडणीससोबत असलेल्या मैत्रीबद्दल तो भरभरून बोलला. त्याच्या मिश्किल अंदाजात विक्रमची मस्करी सुद्धा केली. मग त्याने अनावरण केलं ते सिनेमाच्या म्युझिकचं आणि सिनेमाच्या बहुप्रतिक्षीत ट्रेलरचं.

ट्रेलर पाहुन एसआरके भलता खुश झालेला दिसला शिवाय त्याने सिनेमाच्या टीमचं सुद्धा भरभरून कौतुक केलं. मुक्ता-ललित-प्रसादबद्दल ही तो काही शब्द बोलला आणि मग पुन्हा वळला विक्रमकडे. विक्रमची मस्करी करत तो म्हणाला की. “अरे काही झालं आणि तुझ्या सिनेमाचं इव्हेन्ट असलं तरी कोणीही ब्लॅक ब्लेझरवर अशी गोल्डन टाय घालून येत नसतं रे...” हे ऐकून सगळ्यांना हसू आलं आणि विक्रमने लगेचंच घातलेली गोल्डन टाय काढून फेकून दिली. त्यावर शाहरूख पुन्हा विक्रमची टेर खेचत म्हणाला, “हा आता कसं मस्त दिसतंय...ब्लॅक ब्लेझर... पुन्हा असं करू नकोस” आणि पुन्हा सगळे हसायला लागले. याचवेळी एसआरके स्वतःबद्दल मस्करी करताना ही दिसला. त्याचा झिरो सिनेमा फ्लॉप झाल्यापासून तो थोडा डिप्रेस असल्याच्या बातम्या येत आहेत. हेच काहीसं बहुदा डोक्यात असलेला शाहरुख स्माईल प्लीझ कसा चांगला सिनेमा आहे वगैरे बोलताना म्हणाला की ‘मी कोणीही नाहीये तसा चांगल्या सिनेमे बनवण्याबद्दल बोलणारा...’ आणि मग मिश्किल हसला. थोडी मस्करी आणि भरपूर शुभेच्छा देत शाहरूखने या सोहळ्याला चार चाँद लावले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

 

 

सिनेमाच्या ट्रेलरबद्दल बोलायचं तर सिनेमात मुक्ता बर्वे एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार असून आयुष्यात मध्येच काहीतरी गोंधळ होतो आणि सगळं संपलं असं वाटत असताना तिच्या आयुष्यात ललितची एन्ट्री होते. या दोघांच्या प्रेम खुलणाऱ्या आगळ्या वेगळ्या नात्यावर सिनेमा बेतलेला आहे. सिनेमात प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर सिनेमाचं म्युझिक लोकप्रिय संगीतकार जोडी रोहन-रोहन यांचं आहे. सिनेमाचा ट्रेलर फारंच उत्तम झाला असून त्यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचल्याशिवाय राहत नाही. सध्या सिनेमाच्या प्रमोशनला जोरदार सुरूवात झाली असून येत्या १९ जुलै रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी