Marathi Actress grand Wedding: या' मराठी अभिनेत्रीचं लंडनमध्ये Grand Wedding, लग्नसोहळ्याचा ट्रेलर रिलीज

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 08, 2022 | 18:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonalee Kulkarni grand wedding: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni ) लग्न सोहळा कसा झाला? तिच्या लग्नाचा हा भव्य सोहळा तिच्या चाहत्यांनी खूप मीस केला. मात्र, आता सोनालीचा लग्न सोहळा (Sonalee Kulkarni grand wedding ) कसा झाला हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोनाली-कुणाल वेडिंग स्टोरीमध्ये. त्याचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे.

Sonalee Kulkarni and kunal benodekar wedding story trailer release
'ती'च्या लग्नसोहळ्याचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राच्या अप्सरेचं लंडनमध्ये लग्न, भव्य लग्नसोहळा
  • सोनाली-कुणालची वेडिंग स्टोरी ट्रेलर रिलीज
  • अभिनेत्री सोनालीचा लग्नसोहळा पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Sonalee Kulkarni grand wedding:  महाराष्ट्राची अप्सरा म्हटलं की लगेचंच डोळ्यासमोर येतं ते सोनाली कुलकर्णीचं (Sonalee Kulkarni ) नाव. सध्या सोनाली कुलकर्णी चर्चेत आहे ते तिच्या ग्रॅण्ड वेडिंगमुळे (Grand Wedding ). कोरोना, लॉकडाऊनच्या काळात सोनाली कुलकर्णीचं लग्न झालं ते रजिस्टर. मात्र आता सारं काही सुरळीत होत असताना सोनाली आणि कुणालने पुन्हा एकदा थाटामाटात लग्न केलं. काही दिवसांपूर्वी सोनालीने तिचा हा लग्नसोहळा चाहत्यांना पाहता येणार असल्याचे इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले होते. प्रेक्षकांना आग्रहाचे आमंत्रणही सोनालीने दिले होते. त्यामुळे तिचा हा भव्य लग्नसोहळा पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. सोनाली आणि कुणालच्या ( Kunal Benodekar ) वेडिंग स्टोरीचा ट्रेलर ( Sonalee and Kunal wedding story trailer ) प्लॅनेट मराठीवर रिलीज झालेला आहे. ( Sonalee Kulkarni and kunal benodekar wedding story trailer release on Planet Marathi OTT )

अधिक वाचा : चड्डी- बनियान गँग शोधण्यात दिल्ली पोलिसांना येणार का यश?


सोनाली कुलकर्णीचं लग्न लंडनमध्ये झालं. काही मोजकेच नातेवाईक आणि  मित्रपरिवारासमोर सोनालीचं लग्न झालं. मात्र, त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ कुठेच झळकले नाहीत. त्यामुळे नक्की सोनाली कुलकर्णीचं लग्न झालं कसं? सोनाली-कुणालचा हा लग्नसोहळा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. सोनाली-कुणाल वेडिंग स्टोरी ही 3 भागांची मालिका प्लॅनेट मराठी ओटीटीवर येणार आहे. या वेडिंग स्टोरीचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा ओटीटीवर दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 ऑगस्टला हा लग्नसोहळा मालिकेच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

अधिक वाचा : दगडांमधे बसला आहे एक पक्षी, तुम्ही दाखवा शोधून,

आयुष्यातील या सुंदर क्षणांबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “ आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. माझंही होतं. मात्र, कोरोनामुळे मी आणि कुणालने रजिस्टर लग्न केलं. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आलं नाही. त्यामुळे आता सारं काही रुळावर येत असताना जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आम्ही पुन्हा एकदा लग्न केलं.पारंपरिक पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला. रिसेप्शनही केलं. कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे,  म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवलं आणि आता प्रेक्षक माझा हा लग्नसोहळा आपला समजून पाहू शकतील याचा आनंद आहे.”प्लॅनेट मराठी ओटीटीवर सोनाली-कुणालची वेडिंग स्टोरी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. 

अधिक वाचा :  15 ऑगस्टला मुलांना टिफिनमध्ये द्या 'हे' टेस्टी सँडविच

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी