Sonalee Kulkarni । अप्सरेचा हा नवीन डान्स नंबर खिळवून ठेवेल तुम्हाला, पहा सोनालीचा अनोखा अंदाज

सोनाली कुलकर्णीचे नाव घेताच 'अप्सरा आली...'वर तिने केलेल्या बेभान नृत्य आणि अदाकारीची दृश्यं मराठी रसिकांच्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. आता अजून एका नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे.

Sonalee kulkarni news movie dance number viral on social media
Sonalee Kulkarni । अप्सरेचा हा नवीन डान्स नंबर पाहिला का?   |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • सोनाली कुलकर्णीचे नाव घेताच 'अप्सरा आली...'वर तिने केलेल्या बेभान नृत्य
  • तिच्या अदाकारीची दृश्यं मराठी रसिकांच्या डोळ्यांसमोर तरळू लागतात.
  • आता अजून एका नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे.

मुंबई :  सोनाली कुलकर्णीचे नाव घेताच 'अप्सरा आली...'वर तिने केलेल्या बेभान नृत्य आणि अदाकारीची दृश्यं मराठी रसिकांच्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. आता अजून एका नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे. (Sonalee kulkarni news movie dance number viral on social media )

सोनालीच्या अभिनयासह आरस्पानी सौंदर्याचे चाहते देशभरात आहेत. हे सगळे कायमच तिच्या नवनव्या चित्रपटांची वाट पाहत असतात. समाजमाध्यमांवरही चांगलीच सक्रिय असलेली सोनाली वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्ससह आगामी चित्रपटांबाबतही वेळोवेळी माहिती देत असते. आताही सोनालीच्या अशाच एका पोस्टची चर्चा आहे. 'तमाशा लाइव्ह' या तिच्या बहुचर्चित चित्रपटातले एक नवेकोरे गाणे प्रदर्शित झाले आहे.

अधिक वाचा : Beauty Secrets:चमकदार त्वचेसाठी वापरा करीना कपूरचा चंदन फेस पॅक


'मला तुझा रंग लागला' असे या गाण्याचे बोल आहेत. सोनाली अतिशय आकर्षक पेहरावात आपल्या अनोख्या पदन्यासाची जादू या गाण्यात दाखवते आहे. अल्पावधीतच या गाण्याला तब्ब्ल 1 मिलियनहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 'तमाशा लाइव्ह'ची खास गोष्ट म्हणजे यात स्वत: सोनालीनेही 'कडकलक्ष्मी' हे गाणे गायले आहे.

अधिक वाचा : कॉन्ट्रॅक्ट किलर फेम मोक्षिता राघवचा हॉट अंदाज

'तमाशा लाइव्ह' हा सिनेमा 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरलाही रसिकांचा मोठाच प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरला 3 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. या सिनेमात सोनालीसह पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, मृणाल देशपांडे, सचित पाटील, नागेश भोसले, भरत जाधव, हेमांगी कवी, मनमीत पेम यांच्या भूमिका आहेत.

पुष्कर जोग यानेही स्वदेशी सोशल मीडिया अॅप 'कू'वर एक खास पोस्ट टाकली आहे. पुष्करच्या एका चाहतीने खास स्वत: तमाशा लाइव्हचा ट्रेलर तयार केला आहे. निकिता असे तिचे नाव असून आपल्या पोस्टमध्ये पुष्करने तिचे आभारही मानले आहेत.

अधिक वाचा : पारदर्शक ड्रेसमुळे मलायकानं लावली आग, पण बोल्ड लूकमध्ये केली चूक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी