Teaser of Marathi Movie Baloch Released : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात उभे राहिलेले साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या मराठ्यांनी अतुलनीय असा पराक्रम केला. पण अनेकांना आठवते ती फक्त पानीपतची लढाई आणि त्या लढाईत झालेला पराभव. पण ही काही शेवटची लढाई नव्हती. यानंतरही मराठे लढले. ही लढाई होती बलुचिस्तानमधील लढाई. बलुचिस्तानमधील ही लढाई मराठ्यांनी त्यांच्या अफाट शौर्याच्या जोरावर जिंकली. मराठ्यांनी बलुचिनस्तानमध्ये गाजवलेल्या पराक्रमाची ही गाथा बलोच या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा शुक्रवार 5 मे 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन यांनी केले आहे. या सिनेमात प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत.
टीझरमध्ये आधी रक्ताने माखलेली तलवार दिसते. मागून प्रवीण तरडे यांचा आवाज येतो. पानिपत ही मराठयांची शेवटची लढाई नव्हती, त्यानंतर वाळवंटात सैनिक धारातीर्थी पडलेले दिसतात. नंतर बलुचिस्तान येथील लढाईची दृश्ये टीझरमध्ये दिसतात. अभिनेत्री स्मिता गोंदकर गरोदर असूनही लढताना दिसत आहे. सिनेमातील महत्त्वाचे टप्पे टीझरमध्ये दाखवले आहेत. बलोच या मराठी सिनेमातून बलुचिस्तान येथे मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याची गाथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
'पुष्पा 2' चे पोस्टर बघून चाहते म्हणाले 'फायर है'