नवा सिनेमा 'Colorफुल' लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर नवे सिनेमे प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत. मात्र आता लवकरच 'Colorफुल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

colorful
नवा सिनेमा 'Colorफुल' लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • लवकरच नवा मराठी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
  • कलरफुल सिनेमातून एक नवी कथा रुपेरी पडद्यावर झळकणार
  • वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे दिग्दर्शित करणारे प्रकाश कुंटे करणार 'Colorफुल'चं दिग्दर्शन

मुंबई: लॉकडाऊननंतर (Lockdown) आता चित्रपटसृष्टी (Cine industry) पुन्हा बहरू लागली आहे. हळूहळू शूटिंगला (Shooting) सुरुवात झाली असून नवनवीन कल्पनांना वेग येत आहे. अनेक नवीन सिनेमे आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज होत आहेत. असच यंत्रा पिक्चर्स प्रकाशित प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'colorफुल' (Colorful) हा चित्रपट देखील नवे रंग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कॉफी आणि बरंच काही, &जरा हटके, हंपी आणि सायकल असे अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केलं आहे. त्यामुळे आता colorफुल नवीन काय रंग घेऊन येणार आहे हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. 

मराठी चित्रपट सृष्टीत या निमित्ताने एक नवीन निर्माती म्हणून मात्र या वेळेस नवीन नाव पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची निर्माती मानसी करणार असून या आधी अनेक हिंदी डोक्यूमेंटरी, लघु चित्रपट निर्मितीची जबाबदारी तिने पार पाडली आहे.  प्रयोगशील कलाकृतीची निर्माती म्हणून मानसीची ओळख आहे. हिंदी निर्माती असली तरी मराठीमध्ये अनेक वेगवेगळे विषय, विविध कथानक खुलवून मांडता येतात म्हणून तिने कलरफुल हा पहिलाच मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. नावाप्रमाणे रंगीत असलेल्या या चित्रपटाची रंगीत जादू अनुभवायची असेल तर २०२१ ची वाट पहावी लागेल हे निश्चित. दरम्यान, या चित्रपटात नेमके कलाकार कोणकोण असणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

दरम्यान, या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून सिनेमाच्या नावाप्रमाणे ते देखील खूपच 'colorफुल' आहे. दरम्यान, प्रकाश कुंटे आजवर नवनवे विषय हाताळले असून या सिनेमाची कथा देखील नक्कीच वेगळी असेल अशीच सर्वांना आशा आहे. 

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे मराठी सिनेसृष्टीचं बरंचसं नुकसान झालं आहे. सुरुवातीला शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसांपासून राज्य सरकारने शूटिंगला परवानगी दिल्यामुळे बरेच अडकून पडलेले प्रोजेक्ट मार्गी लागले आहेत. तसंच आता सिनेमागृह आणि थिएटर सुरु करण्यास परवानगी मिळाल्याने आता येत्या काळात प्रेक्षकांना नक्कीच नवनवे सिनेमे पाहायला मिळू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी