'काय झाडी, काय हाटील ओकेमध्ये एकदम', म्हणत 'दे धक्का'ची मंडळी पोहचली इंग्लंडला

De Dhakka 2 Trailer Out : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'दे धक्का 2' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठी चित्रपट 5 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Trailer Of Mahesh Manjrekar’s De Dhakka 2 Out, Watch Now
'काय झाडी, काय हाटील ओकेमध्ये एकदम', म्हणत 'दे धक्का'ची मंडळी पोहचली लंडनला ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • दे धक्का 2 चा ट्रेलर आऊट,
  • महेश मांजरेकर यांनी बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केला
  • मराठी चित्रपट 5 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुचर्चित 'दे धक्का २' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला असून लवकरच हा चित्रपट रिलिज होणार असल्याने ट्रेलर पाहून प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आपल्या हटके स्टाईलने लोकांना खळखळून हसवणारे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचा काय झाडी, काय डोगांर, काय हाटील ओकेमध्ये, हा डायलाॅगची झलक या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा : Tejashri pradhan and Nivedita saraf relationship : आसावरी आणि शुभ्रा पुन्हा एकत्र, असा रंगला मेजवानीचा फक्कड बेत

‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केलं होते. त्यावेळी या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याचा दे धक्का २ हा रिमके असून महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले होते.  मध्ये अभिनेता मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम यांच्यातील विनोदी जुगलबंदीसह स्वत: महेश मांजरेकर निगेटिव्ह रोलमध्ये आहेत. यांच्यासह मेधा मांजरेकर आणि सक्षम कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा : Fanaa Ishq Mein Marjawan Serial: फना इश्क में मरजावान टीव्ही मालिका बंद होणार, शेवटचा भाग 'या' दिवशी होणार टेलीकास्ट?

यावेळी चित्रपटाची कथा कोल्हापूरतून लंडनमध्ये घडताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत. नुकताच सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये मकरंद अनासपुरे आणि इतर कलाकार जेव्हा इंग्लडला पोहचतात. तेव्हा शिवाजी साटम म्हणतात, 'काय झाडी, काय हाटिल ओकेमध्ये एकदम, ' अशा कोट्या या टीझरमध्ये भरपूर दिसतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी