Ved Movie Box Office Collection Day 6: सहाव्या दिवशीही लोकांना आहे रितेशच्या सिनेमाचे 'वेड', जमवला कोट्यवधी रुपयांचा गल्ला

Ved Movie Box Office Collection Day 6:  वेड  हा मराठी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे.  त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा हिने त्याची निर्मिती केली आहे. तेलुगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रातील तमान प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

Ved Movie Box Office Collection Day 6
सहाव्या दिवशी लोकांना आहे रितेशच्या सिनेमाचे 'वेड', जमवला कोट्यवधी रुपयांचा गल्ला   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रितेश आणि जेनेलियाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
  • दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशा भूमिकेतून रितेशनं वेडचं शिवधनुष्य पेलंल
  • या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसात सुमारे 18 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Ved Movie Box Office Collection Day 6 :मुंबई :  वेड (Ved )  हा मराठी (Marathi) भाषेतील रोमँटिक (Romantic) ड्रामा चित्रपट (Movie ) आहे ज्याचे दिग्दर्शन (Direction) रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी केले आहे.  त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा (Genelia D'Souza) हिने त्याची निर्मिती केली आहे. तेलुगू (Telugu) चित्रपटाचा रिमेक असलेल्या या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रातील (Maharashtra) तमान प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. गेल्या पाच दिवसाची कमाई पाहता वेड हा सुपरडुपर हिट ठरला आहे. सहाव्या दिवशीही या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. (Ved Movie Box Office Collection Day 6)

अधिक वाचा  : Anil Parab : अनिल परबांची एवढ्या कोटींची संपत्ती जप्त

रितेश देशमुखचा वेड हा सिनेमा मुळात एका तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे.  2019 मध्ये हा सिनेमा तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. शिवा निर्वाणा यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे तर यात नागा चैतन्य  हा मुख्य भूमिकेत होता. दरम्यान रितेश केलेल्या वेडला लोकांना डोक्यावर घेतलं आहे. डिसेंबर 30 ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. 
 अधिक वाचा  : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये

 या चित्रपटाची पाच दिवसांची कमाई पाहून अनेकांना धक्का बसेल. चला तर आपण या सिनेमाच्या सहा दिवसांची कमाई जाणून घेऊ. वेड या सिनेमाने चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 2.30 कोटी रुपयांची कमाई केली.  दुस-या दिवशी कमाईत मोठी भरारी घेत या चित्रपटाने सुमारे 3.20 कोटी कमावले. रविवारी सुमारे 4.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.  

येथे चित्रपटाचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन ;

Day 1 – 2.30 कोटी
Day 2 – 3.20 कोटी
Day 3 – 4.50 कोटी

Total 3rd Day Collection: 10 कोटी
Day 4 – 3 कोटी
Day 5 – 2.65 कोटी
Day 6 – 2.30 कोटी*Total Collection Till Now: 18 कोटी.

अधिक वाचा  : भारतीय रेल्वेत परीक्षा न देता थेट नोकरी,10वी पास करा Apply

दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशा भूमिकेतून रितेशनं वेडचं शिवधनुष्य पेलंल आणि ते यशस्वी करुन दाखवलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून याची चर्चा सोशल मीडियावर होत होती.  डिसेंबर 30 ला सिनेमा जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा अजून जास्त होऊ लागली आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. अशोक सराफ, जेनेलिया आणि रितेश यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या चित्रपटांमधून रितेश आणि जेनेलियाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. 

या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसात सुमारे 18 कोटींचा गल्ला जमवला आहे आणि अजूनही चित्रपट अधिकाधिक कमाई करेल अशी शक्यता आहे, चित्रपटाने आत्तापर्यंत 30 कोटींपेक्षा कमी कमाई केली आहे, आता हा चित्रपट बॉक्स  ऑफिसवर किती कमावतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण रितेश आणि जेनेलियानं अनेक जिल्ह्यात या सिनेमाचे प्रमोशन केले आहे.  जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून प्रेक्षकांना आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी