Ved Movie Box Office Collection Day 5: सुपरडुपर हिट ठरणार रितेशचा सिनेमा; पाचव्या दिवशीही 'वेड'ची दमदार कमाई

Ved Movie Box Office Collection Day 5: बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शन डे 5 ला ऑल-टाइम टॉप 5 ओपनिंगनंतर महाराष्ट्र बॉक्स ऑफिसवर वेड  या चित्रपटाला शुक्रावारनंतर पाचव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे. रितेशच्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी अडीच कोटीची कमाई केली आहे.

 ved Marathi movie BO Collection Day 5 read in marathi
सुपरडुपर हिट ठरणार रितेशचा सिनेमा; पाचव्या दिवशीही वेड ची दमदार कमाई  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वेड सिनेमाची घोडदौड कायम
  • रितेशच्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी अडीच कोटीची कमाई केली आहे.
  • तोंडी प्रसिद्धीमुळे कमाईचे अनेक विक्रम वेड सिनेमाने मोडले आहेत.

Ved Movie Box Office Collection Day 5: मराठी (Marathi)वेड (Ved)चित्रपटाने अनेकांना वेड लावलं आहे. दक्षिण भारतीय चित्रपट मंजिलीचा रिमेक जरी असला तरी या सिनेमाने (movie) प्रेक्षकांना भलतेच वेड लावले आहे.  प्रेक्षकांच्या (audience)या प्रेमामुळे आणि उदंड प्रतिसादामुळे वेड या सिनेमाच्या कमाईची घोडदौड पाचव्या दिवशीही जोरात चालू आहे. बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शन डे 5 ला ऑल-टाइम टॉप 5 ओपनिंगनंतर महाराष्ट्र बॉक्स ऑफिसवर वेड  या चित्रपटाला शुक्रावारनंतर पाचव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे. रितेशच्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी अडीच कोटीची कमाई केली आहे. ( ved Marathi movie BO Collection Day 5 read in marathi)

अधिक वाचा  :  वीज कर्मचाऱ्यांचा संप;बत्ती गुल झाल्यास 'या' नंबरवर करा रिंग
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' सिनेमाचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेड या सिनेमाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका रितेश देशमुखने केली आहे. या  सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुख याने दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे.  या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने स्क्रिन शेअर केली आहे. रितेशला जिनिलियाची खंबीर साथ मिळाली आहे.

लय भारी नंतर या जोडीने पडद्यावर पुन्हा एकदा रोमांस फुलवला आहे.  2014 मध्ये आलेला लय भारी सिनेमाही हिट ठरला होता. आता या जोडीचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सूपरहिट ठरत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या सिनेमाच्या   तोंडी प्रसिद्धीमुळे कमाईचे अनेक विक्रम वेड सिनेमाने मोडले आहेत.

अधिक वाचा  : विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केली लघवी

शुक्रवारनंतर बुधवारी या सिनेमाने अडीच कोटीचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 15.04 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जिनिलियाचं मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे. त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. 

'वेड' सिनेमा 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्यभरातील 250 स्क्रिनवर हा चित्रपट रिलीज झाला असून 1000 शो मिळाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होताच राज्यातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करून 'वेड'नं केलेल्या कमाईचे आकडे जाहीर केले. त्यानुसार सिनेमानं अवघ्या चार दिवसांत विक्रमी कमाई करत वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तीन दिवसांत 'वेड' सिनेमाने तब्बल 13 कोटींहून अधिकची कमाई केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी