ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फणसवाडी येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी जगाचा निरोप घेतला. (Veteran Lavani empress Sulochana Chavan passed away)

Lavani empress Sulochana Chavan passed away
ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन   |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई :  ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचे निधन (passed away)झाले आहे.  वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील  (Girgaon)फणसवाडी (Fanswadi) येथील निवासस्थानी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सुलोचना चव्हाण यांचा भारत सरकारने (Government of India)पद्मश्री  (Padmashri award)  देऊन सन्मान केला होता.  आजही सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या लावण्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी फक्त लावण्याचे नाही, तर भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले आहे. (Veteran Lavani empress Sulochana Chavan passed away)

अधिक वाचा  : सिन्नर येथे पुन्हा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू

'लावणी सम्राज्ञी’असा लौकिक प्राप्त झालेल्या सुलोचना चव्हाण  यांनी हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टी आपल्या आवाजाची जादू चालवली होती. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना  चव्हाण यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली. पण मराठी सिनेमांमधील लावणी त्यांची खरी ओळख ठरली. त्यासाठी ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला होता.  

अधिक वाचा  : ट्रान्सजेंडर व्यक्तीही पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करू शकणार

बोर्डावरची लावणी माजघरात आणणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. लग्नाआधी त्यांनी सुमारे 70 हिंदी सिनेमांमध्ये पार्श्वगायन केलं. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी ‘भोजपुरी रामायण’गायिलं होतं. 

लोकप्रिय लावण्या

'रंगल्या रात्री अशा’ सिनेमातील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच गाजल्या. ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हंत्यात लवंगी मिरची’ ही लावणी प्रचंड गाजली.  ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा ’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का?’अशा अनेक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी गायल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी