ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या तब्येतीत सुधारणा

Vikram Gokhale Health Update, Actor shows improvement : पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली.

Vikram Gokhale Health Update, Actor shows improvement
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या तब्येतीत सुधारणा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या तब्येतीत सुधारणा
  • पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी दिली माहिती
  • विक्रम गोखले उपचारांना प्रतिसाद देत आहेत

Vikram Gokhale Health Update, Actor shows improvement : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर 15 दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे विक्रम गोखले यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तब्येत आणखी बिघडल्यामुळे विक्रम गोखले यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आले. यानंतर आता शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयाने माहिती दिली. 

रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. विक्रम गोखले यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. विक्रम गोखले यांनी डोळे उघडले आणि हात-पाय हलवून उपचारांना प्रतिसाद दिला. तब्येतीत आणखी सुधारणा झाल्यास पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात येईल. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे; असे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी सांगितले. 

Top 5 Hottest ULLU Web Series : Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात, पाहा त्याची झलक 

याआधी विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत उलटसुलट वृत्त येत होते. काही माध्यमांनी विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त दिले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

धक्कादायक : 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू

'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची बबीता अपघातात जखमी

विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा

विक्रम गोखले यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटक या सर्व माध्यमांमध्ये काम केले आहे. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या सर्व क्षेत्रात विक्रम गोखले यांनी छाप पाडली आहे. विक्रम गोखलेंना 2013 मध्ये 'अनुमती' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. घशाच्या त्रासामुळे त्यांनी 2016 मध्ये नाटकातून काम करणे थांबविण्याचा निर्णय घेतला. 

अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून विक्रम गोखलेंना 2015 मध्ये विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांना ‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विक्रम गोखलेंना 2017 मध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार या दोन पुरस्कारांना सन्मानीत करण्यात आले. यानंतर 2018 मध्ये पुलोत्सव सन्मान पुरस्काराने विक्रम गोखलेंचा गौरव करण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी