पावनखिंड चित्रपट पाहा या दिवशी प्रवाह पिक्चरवर 

अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय. प्रवाह पिक्चर या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे. रविवार १९ जूनला दुपारी १ वाजता तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच प्रवाह पिक्चरवर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.

Watch Pavankhind marathi movie on pravah picture 19 june
पावनखिंड चित्रपट पाहा या दिवशी प्रवाह पिक्चरवर   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय.
  • रविवार १९ जूनला दुपारी १ वाजता तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच प्रवाह पिक्चरवर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
  • प्रवाह पिक्चर या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांमधील महापराक्रमी आणि शूरवीर असा हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे.

'तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!' असं म्हणत आपल्या राजासाठी प्रत्यक्ष मृत्यूलाही बाजीप्रभूंनी प्रतीक्षा करायला लावली. बांदल सेनेच्या साथीने बाजीप्रभूंनी घोडखिंडीत अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत गनिमाला थोपवून धरलं. बाजीप्रभूंच्या पराक्रमाने ही घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन झाली. अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय. प्रवाह पिक्चर या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे. रविवार १९ जूनला दुपारी १ वाजता तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच प्रवाह पिक्चरवर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी