मुंबई : प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स (मराठी) सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याला मराठी चित्रपट जगतातील अनेक नामांकित चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. पॉवर-पॅक परफॉरमेंसपासून ते नेल-बाइटिंग विजेत्यांच्या घोषणांपर्यंत, शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अनेक क्षण पाहायला मिळाले. आनंदी गोपाळ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार असो की दीपक डोब्रियाल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ब्लॅक लेडी घेऊन गेला असो हे व असे काही रोमांचक क्षण या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते.
मुक्ता बर्वे हिने स्माईल प्लीज या चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला, तर ललित प्रभाकरने समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार (पुरुष) जिंकला. या सोहळ्यातील विजेत्यांची यादी खूप इंटरेस्टिंग आहे. ती खालील प्रमाणे
बेस्ट फिल्म
आनंदी गोपाळ
बेस्ट डायरेक्टर
समीर विध्वन्स- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट फिल्मसाठी क्रिटिकचा पुरस्कार
राज आर गुप्ता - बाबा
सर्वोत्कृष्ट अभिनेता
दीपक डोब्रियल- बाबा
समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पुरस्कार (
ललित प्रभाकर- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मुक्ता बर्वे- स्माईल प्लीज
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी क्रिटिकचा पुरस्कार (स्त्री)
सोनाली कुलकर्णी (हिरकणी) आणि भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)
सहाय्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता
शशांक शेंडे- कागर
सहाय्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
नीना कुलकर्णी- मोगरा फूलला
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम
आनंदी गोपाळ- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी
बेस्ट गीतकार
क्षितिज पटवर्धन- तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (पुरूष)
आदर्श शिंदे- खारी बिस्किट ( तुला जपणार आहे)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (स्त्री)
शाल्मली खोलगडे- गर्लफ्रेंड (क्वेरीडा क्विरिडा)
सिनेमातील उत्कृष्टता
महेश कोठारे
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरूष)
शुभंकर तावडे- कागर
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)
शिवानी सूर्वे- ट्रिपल सीट
सर्वोत्कृष्ट संचालक
सलील कुळकर्णी- वेडिंगचा शिनेमा
बेस्ट ओरिजनल स्टोरी
मनीष सिंह- बाबा
सर्वोत्कृष्ट स्क्रीन
करन शर्मा- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट डायग्नॉग
इरावती कार्णिक- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी क्रमांक
सौरभ भालेराव- गर्लफ्रेंड
बेस्ट प्रोडक्शन डिझाईन
सुनील निगवेकर आणि निलेश वाघ- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
आकाश अग्रवाल- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट नृत्य
राहूल ठोंबरे आणि संजीव हवालादार (माझी स्टोरी क्युटीवाली स्विटवाली लव्ह स्टोरी-
गर्लफ्रेंड)
बेस्ट कॉस्ट्यूम
पूर्णिमा ओक (फत्तेशिकस्त)
उत्कृष्ट संपादन
चारुश्री रॉय- आनंदी गोपाळ
बेस्ट साऊंड डिझाईन
निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर-फत्तेशिकस्त
बेस्ट बाल कलाकार
आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर (खारी बिस्कीट)