Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना दुर्घटना, तरुण 100 फूट खाली कोसळला

young man fell 100 feet down while shooting of mahesh manjrekar movie at panhala fort : महाराष्ट्रात पन्हाळ गडावरील सज्जा कोटी येथे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठी वीर जोडले सात' या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना एक दुर्घटना झाली

young man fell 100 feet down while shooting of mahesh manjrekar movie at panhala fort
महेश मांजरेकरांच्या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना दुर्घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महेश मांजरेकरांच्या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना दुर्घटना
  • तरुण 100 फूट खाली कोसळला
  • तरुण गंभीर जखमी, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

young man fell 100 feet down while shooting of mahesh manjrekar movie at panhala fort : महाराष्ट्रात पन्हाळ गडावरील सज्जा कोटी येथे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठी वीर जोडले सात' या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना एक दुर्घटना झाली. शूटिंग सुरू असताना 19 वर्षांचा नागेश खोबरे नावाचा तरुण किल्ल्याच्या तटबंदीवरून १०० फूट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. जखमी नागेशवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवार 18 मार्च 2023 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

नागेश शूटिंगसाठी आणलेल्या घोड्यांच्या देखभालीचे काम करत होता. मोबाईलवरचे बोलणे संपवून सज्जा कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवरून चालत पुढे जात असताना नागेशचा तोल गेला आणि तो 100 फूट खाली कोसळला. तरुण तटबंदीवरून पडल्याचे लक्षात येताच काही नागरिक तातडीने दोरखंड लावून सावधपणे खाली उतरले. त्यांनी नागेशला आणखी एका दोरखंडाच्या मदतीने वर काढले. नागेशच्या डोक्याला आणि छातीला गंभीर इजा झाल्याचे लक्षात येताच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आधी नागेशला कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले नंतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. नागेशची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोविडची लस H3N2 वर किती प्रभावी?

डोळ्यांची क्षमता वाढवणारे सुपरफूड

एका तरुणाला मारहाण

जखमी नागेशला उचलून वर आणताना त्याचे मोबाईल चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला मारहाण झाली. तसेच नागेशच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी जात असलेल्या पोलिसांना काही नागरिकांना अडवले होते. यामुळे नेमके काय घडले यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याआधी     'मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या सात कलाकारांच्या भूमिका आणि त्यांच्या वेशभूषेवरून वाद झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी