Sairat: 'सैराट'मधला 'प्रिन्स दादा' अखेर पोलिसांसमोर झाला हजर

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 25, 2022 | 03:09 IST

AHMEDNAGAR: सैराटमधील प्रिन्सची भूमिका साकारण्याऱ्या सूरज पवार या अभिनेत्याला फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी आज पोलीस ठाण्यात हजर राहावं लागलं.

Sairat Prince: अहमदनगर: मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाच्या प्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली असताना सर्वत्र गाजलेल्या 'सैराट' चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या व राहुरी पोलिसांच्या रडारवर असलेला सूरज पवार हा अभिनेता आज अखेर पोलिसांसमोर हजर झाला. (sairat fame prince actor suraj pawar had to appear at police station today for investigation in a cheating case)

सूरजसोबत त्याचे दोन वकील साथीदारही होते. पोलीस उपनिरीक्षक सज्जन नऱ्हेडा यांनी आज त्याची दिवसभर चौकशी केली. मात्र या रॅकेटमध्ये आपला कुठलाही सहभाग  असल्याचे सांगत सूरज पवारने सर्व आरोप फेटाळून लावले. 

या प्रकरणी अटकेत असलेले आपले मित्र आहेत. एवढेच त्याने मान्य केले. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला घरी जाऊ दिले.  सोमवारी पुन्हा राहुरीला चौकशीसाठी प्रिन्सला बोलाविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी