Saaho Movie Review: पाहा कसा आहे प्रभासचा साहो सिनेमा

रिव्ह्यू टाइम
Updated Aug 30, 2019 | 14:41 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Saaho Movie Review: बाहुबली फेम प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार हे समजताच साहो सिनेमाची भलतीच क्रेझ होती. श्रद्धा कपूर आणि प्रभासचा साहो नुकताच रिलीज झालाय पण जितकी क्रेझ होती ती क्रेझला सिनेमा न्याय देऊ शकलाय का?

prabhas and shraddha Kapoor starrer saaho movie review
Saaho Movie Review: प्रभासच्या 'बाहुबली' सारखी जादू 'साहो'मध्ये पुसटशीही दिसत नाही  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • प्रभास-श्रद्धा कपूर स्टारर साहो सिनेमाचा सखोल रिव्ह्यू
  • बाहुबलीच्या आसपास सुद्धा जात नाही साहोचा प्रभाव
  • प्रभास भूमिकेत फिट तर श्रद्धाचा वावर फिका

बाहुबली सिनेमात अवतरलेला प्रभास बॉलिवूडमध्ये साहो सिनेमातून पदार्पण करणार हे समजताच या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सिनेमा प्रभाससाठी पाहणाऱ्यांची असल्याची संख्या बरीच होती. अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झालाय. श्रद्धा कपूर आणि प्रभास अशी फ्रेश जोडी असलेला हा सिनेमा या सगळ्या प्रतीक्षेला आणि उस्तुकतेला न्याय देऊ शकला आहे का? चला पाहुयात. सिनेमाची सुरुवात तशी बऱ्याच ट्विस्टने होते. मोठ-मोठ्या इमारती आणि अनेक गंभीर लूक असलेली काही माणसं यावर सिनेमा सुरु होतो. त्यांतर सिनेमाच्या पूर्वाधात अनेक शहरांचा उल्लेख होतो आणि नंतर ती दाखवली सुद्धा जातात आणि तिथेच मुंबईतून गायब झालेल्या एका काळ्या रंगाच्या बॉक्सचा शोध सुरु होतो. सिनेमा एक अॅक्शन थ्रीलर असल्याने थ्रीलिंग सस्पेन्स द्याचा प्रयत्न सिनेमात केला गेला आहे.

सिनेमात प्रभास कमालिचा हॅण्डसम दिसतोय आणि त्याचे उत्तम अॅक्शन सिक्वेस्न सुद्धा दाखवले गेले आहेत. खरंतर या भूमिकेत प्रभास एकदम फिट बसला आहे पण तरीही बाहुबलीची जादू काही केल्या ही भूमिका कायम ठेवू शकत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. सिनेमातली त्याची भूमिका एकदम डॅशिंग आहे पण त्या मानाने त्याचे डायलॉग्स खूपच स्लो पद्धतीने बोलले गेले आहेत. प्रभासची भूमिकाच खूप रहस्यमयी आहे त्यामुळे बहुदा असं केलं गेलंय. कारण त्याच्या भूमिकेत इतक्या छटा आहेत की जर डायलॉग सुद्धा फास्ट बोलला असता तर कदाचीत सगळंच डोक्याच्यावरुन गेलं असतं. तसंच श्रद्धाच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात ती खूपंच ग्लॅमरस तर दिसली आहे पण ग्लॅमर पलिकडे तिच्या भूमिकेतून फारसं काहीच दिसत किंवा सिनेमाला मिळत सुद्धा नाही. मुळात भूमिका लिहीली गेली असतानाच फसली आहे आणि म्हणून अगदी काही वेळातच तिचा सिनेमातला वावर फिका वाटू लागतो. इतरांना वाचवायच्या जागी नंतर श्रद्धालाच सतत वाचवावं लागण्याची वेळ सिनेमात वारंवार येते.

प्रभास आणि श्रद्धाच्या केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर ती ठिकंच आहे पण ही जोडी मात्र फ्रेश असली तरी सिनेमात मात्र ती भावत नाही. दुसरीकडे जर सिनेमाच्या खलनायकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिनेमात खलनायकांचा भडिमार आहे. असं असून सुद्धा चंकी पांडे सोडल्यास एकही व्हिलन इम्प्रेस करण्यात यशस्वी ठरत नाही. चंकी पांडे आपल्या भूमिकेने एक वेगळीच छाप नक्कीच पाडतो. सिनेमातली गाणी चांगली झाली आहेत पण पुन्हा ती अशा ठिकाणी चित्रीत केली गेली आहेत की सिनेमाच्या कथेला ती पुरक ठरत नाहीत. तसंच सिनेमातले काही कॉमेडी सीन्स देखील हवी ती मज्जा सिनेमात आणायला अयशस्वी ठरतात.

सिनेमाचा पूर्वार्ध तर गंडला आहेच पण त्या मानाने उत्तरार्धाची सुरुवात जरा बरी होते. पण पुन्हा लिखाणात फारच चुका असल्या कारणाने सिनेमा पुन्हा पकड धरु शकत नाही. ३५० कोटी इतक्या भव्य बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत ही फार चांगली कामगिरी करु शकलेला नाही. सतत त्यात काहीतरी कमी आहे हे सिनेमा पाहताना जाणवतं. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सिनेमाला मारक ठरतं. प्रभासच्या बाहुबलीनंतर बॉलिवूड डेब्यूसाठी कदाचित त्याने दुसरा दमदार सिनेमा निवडला असता तर योग्य झालं असतं असं नक्कीच वाटतं. साहोचं स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्लेमधल्या चुका सिनेमाला हवी ती पकड देऊ शकत नाही. शिवाय सततचे ट्विस्ट सिनेमाचा एकंदर प्रभाव फोल ठरवतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी