Movie review : संजय दत्तचा जीवनपट

रिव्ह्यू टाइम
Updated Jul 03, 2018 | 16:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

संजय दत्तची कहाणी ही एक स्टार होण्यासोबतच एका मुलाचीही आहे जो खलनायकापासून हिरो बनतो. रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका अत्यंत खुबीने साकारली आहे. यासोबतच तुरुंगाभोवती फिरणारा त्याचा २३ वर्षांचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

sanju cinema
sanju movie review 

मुंबई : संजू सिनेमात संजय दत्तची भूमिका साकारणाऱ्या रणबीरची पहिली झलक पाहून हा सिनेमा दमदार असणार असे वाटले होते. रणबीर कपूरच्या टॅलेंटवर बॉलीवूड इंडस्ट्रीने नेहमीच विश्वास ठेवलाय. मात्र बॉलीवूडमधील आपल्या १९व्या सिनेमातून रणबीरने दाखवून दिले की, अभिनय कसा त्याच्या नसानसात भिनलाय. याआधी रणबीर कपूरने बचना ऐ हसीनो, अजब प्रेम की गजब कहानी, रॉकेट सिंह, अनजाना अनजानी, रॉकस्टार, बर्फी, ये जवानी है दिवानी, तमाशा, बेशर्म, ऐ दिल है मुश्किल, जग्गा जासूसह त्याने १८ सिनेमांत काम केलेय. संजू हा सिनेमा बॉलीवूड जगतात बाबा अशी ओळख असलेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित आहे.

हा सिनेमा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलाय तर विधु विनोद चोपडा यांची निर्मिती आहे. या सिनेमात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर, सुनील दत्तच्या भूमिकेत परेश रावल, नर्गिसच्या भूमिकेत मनीषा कोईराला, मान्यता दत्तच्या भूमिकेत दिया मिर्झा आहे. तर सहाय्यक भूमिकेत सोनम कपूर (रूबी), व‍िक्‍की कौशल (कमलेश कन्‍हैया कपासी), अनुष्‍का शर्मा (व‍िनी डाइस), बोमन ईराणी ज‍िम सर्ब यांनी भूमिका साकारल्यात.

सिनेमाची कहाणी

संजय दत्तचा हा सिनेमा २ तास ४० मिनिटांचा आहे. १९९२मधील बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर या कहाणीची सुरुवात होते. यावेळी सुनील दत्त संसदेत असतात आणि ते दंग्यामधील पीडितांना अन्न पुरवण्याचे काम करत असतात. यावेळी अंडरवर्ल्डकडून संजय दत्तला फोन येतो की, आपल्या वडिलांना समजावून सांगावे की दंग्यामधील पीडितांना मदत करणे थांबवावे. या फोननंतर संजय दत्त घाबरतो आणि वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सुनील दत्त काही ऐकत नाही. 

यानंतर सनम सिनेमाचा दिग्दर्शक त्याला सुरक्षेच्या दृष्टीने एके ५६ स्वत:जवळ बाळगण्याची सूचना देतो. हे लोक संजय दत्तला ३ एके ५६ आणि बुलेट देतात. संजय दत्त दोन बंदुका परत करतो. एका सिनेमासाठी संजय दत्त मॉरिशसला निघून जातो. १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईमध्ये १२ ठिकाणी बॉम्बस्फोट होता. यावेळी एके ५६ बाळगण्याच्या आरोपाखाली मॉरिशसवरुन परतताच अटक केली जाते.

अभिनय

पहिल्या सीनमध्ये संजय दत्तची भूमिका साकारणारा रणबीर कपूर आपली जीवनकथा लिहिणाऱ्या लेखकाशी बातचीत करताना दिसत आहे. या बातचीत दरम्यान त्याची तुलना महात्मा गांधीशी केली जाते. दरम्यान, हा सीन तितका प्रभावी नाहीये. सिनेमाच्या पहिल्या भागात संजय दत्त जेव्हा ड्रग्जच्या नशेत धुंद होता तेव्हाचा काळ आहे. रणबीरने इतक्या खुबीने संजय दत्त साकारलाय की अनेकदा हा संजय दत्त की रणबीर कपूर यात गोंधळ होतो. अनुष्का शर्मा पुन्हा एकदा पीके सिनेमातील लूकमध्ये दिसतेय. इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिलाय.

सिनेमाचे डायलॉग

संजय दत्त- मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं, ड्रग एडिक्ट हूं, सब हूं लेकिन टेररिस्ट नहीं हूं। 
संजय दत्त- पहली बार ड्रग्स ली क्योंकि Dad से नाराज था, दूसरी बार मां बीमार थी, तीसरी बार में ड्रग एडिक्ट बन चुका था।
अनुष्‍का शर्मा- बीवी के अलावा कितनी औरतों के साथ सोए हो? यावर संजय बोलतो  prostitute को गिनूं या उनको अलग रखूं। उनको अलग रखता हूं। 308 तक याद है। आप सेफ्टी के लिए 350 लिख लो।
व‍िकी कौशल- हमारे गांव में कहावत है, घी चे तो घपाघप, संजू म्हणतो - ट्रांसलेट कर, तेव्हा मित्राने सांगितले - घी मतलब पैसा और घपाघप मतलब- सेक्स। 
परेश रावल- अंडरवर्ल्ड से दोस्ती करेगा तो प्रेस वाले पीछे पड़ेंगे ही ना। आणखी एका डायलॉगमध्ये ते म्हणतात, मेरा बेटा कोई गुजरा हुआ वक्त नहीं है जो लौटके वापस नहीं आ सकता। 

सिनेमा का पहावा ?

साधी आणि सरळ गोष्ट म्हणजे जर तुम्ही संजय दत्त वा रणबीरचे फॅन आहात तर तुम्ही हा सिनेमा जरुर पाहाल. संजूची ही कहाणी म्हणजे वडिल आणि मुलाच्या नात्याची गोष्ट आहे. यात दोन प्रकारचे मित्र दाखवण्यात आलेत एक जीवाला जीव देणारा तर दुसरा मित्राचेच जीवन उद्ध्वस्त करणारा. तसेच एक अशी पत्नी जी आपल्या नवऱ्याला प्रत्येक पावलावर साथ देते. तसेच सत्यासाठी लढत असते. 

स्टार : साडे तीन
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी