रिव्ह्यू: मुक्ता बर्वेच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला 'स्माईल प्लीज' आहे तरी कसा?

रिव्ह्यू टाइम
Updated Jul 19, 2019 | 15:10 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Smile Please Marathi Movie Review: मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर व प्रसाद ओक यांच्या मुख्य भूमिका असलेला स्माईल प्लीज सिनेमा आज भेटीला आलाय. सिनेमा कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा आमचा हा सखोल रिव्ह्यू नक्की वाचा.

Smile Please Marathi movie review
मनाला भावणारा, मुक्ता बर्वेच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला स्माईल प्लीज  |  फोटो सौजन्य: Instagram

अनेकदा आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरत असतो आणि कधी-कधी आयुष्यच आपल्याचा त्याची जाणिव करुन देते. स्माईल प्लीजची सुरुवात काहीशी तशीच होते. आयुष्यात एक यशस्वी फोटोग्राफर असलेल्या नंदीनी जोशीच्या (मुक्ती बर्वे) आयुष्यात सगळं आलबेल असतानाच एक वादळ येतं आणि आयुष्य पार बदलून जातं. नंदीनी तिचा नवरा शिशीर सारंग (प्रसाद ओक) पासून घटस्फोट घेऊन वडील आप्पा (सतीश आळेकर) यांच्यासोबत राहत असते. पण तरीही तिच्या नवऱ्यासोबतचं नातं एका मित्राप्रमाणे असतं, त्यात या दोघांची मुलगी नुपूर या दोघांमधला एक दुवा असते. पण नुपूरचं आईसोबत काही केल्या पटत नाही आणि तिची सतत चिडचिड होत असते आईसमोर आली की. असं सगळं सुरु असताना एक यशस्वी करिअर वुमनचं आयुष्य जगत असताना नंदीनीला डिमेन्शिया (Dementia) नावाचा आजार झाल्याचं निदान होतं आणि अचानकच सगळं बदलून जातं.

नंदीनीची खास मैत्रीण डॉक्टर अंजली (आदिती गोवित्रीकर) तिच्या उपचारांना सुरुवात तर करते पण या आजारावर थेरपी सोडल्यास काही उपचार नाहीयेत. आणि या आजारात माणूस हळू-हळू अगदी साध्या सरळ गोष्टी म्हणजे शब्द, अक्षर ओळख, वस्तूंची नावं, ठिकाण, माणसं असं सगळे विसरु लागतो. तर कालांतराने आजार बळावतो आणि गोष्टी कठीण होतात. तसंच काहीसं नंदीनीसोबत होताना दिसते. ज्यामध्ये तिचे वडील आप्पा आणि पूर्वाश्रमीचा नवरा शिशिरही खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे असतात. पण तिचा मुलगी मात्र अजूनही आईचा तिरस्कार करत असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
'कधीतरी काहीतरी वाईट होईल, म्हणून आपण आता जगायचे थांबत नाही ना.' #Promo On Everest Marathi : http://bit.ly/2xUk3az #SmilePleaseTheFilm #NowInCInemas Book Tickets : http://bit.ly/BookSmilePleaseTickets #ShwaasDe Song : http://bit.ly/ShwaasDeSong #SmilePleaseTrailer : http://bit.ly/TrailerSmilePlease #SmilePleaseAnthem : http://bit.ly/SmilePleaseAnthem #AnolkhiSong : http://bit.ly/AnolkhiSong #SmilePleaseTheFilm #19July Smile Please Film by #VikramPhadnis #MuktaBarve #LalitPrabhakar #PrasadOak @SmilePleaseTheFilm by @vikramphadnis @muktabarve @lalit.prabhakar @oakprasad @krtyavat #HashtagFilmStudios @everestentertainment @sunshinestudiosindia @aditigovitrikar @actortrupti #SatishAlekar @Mahajan.Vedashree @bijayAnand @MayureshWadkar @ro_prads @RohanGoks @rohanrohanmusic_ @Milind_Jog @IraKarnik @godbolemonika @ashisharma630 @Boscomartis @Avadhoot_Gupte @Sunidhichauhan5 @Belashende_official @Mugdhakharade_ @the_Manndar @Rohanmapuskar @Redchillis.color @p16studios @magicalmakeoversbycherag @bhanushaliamitt @umeshmshinde092 #ImranMahadik @faizee222 @milindmatkar @praful_karlekar @mixwithrohit @rakeshwadhwa5252 @meSwapnilGodbole @amrutamane48 @sameerbhosle9 @thatsHummingbees @prathmeshrangolephotography . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #marathistars#vikramphadnis #muktabarve#lalitprabhakar #prasadoak#aditigovitrikar #SmilePlease #SmilePleaseFilm A post shared by Everest Entertainment (@everestentertainment) on

हळू-हळू गोष्टी कठीण होत जात असतानाच आणि नंदिनी आजाराच्या विळख्यात अडकलेली असताान अगदी देवासारखी एन्ट्री होते ती विराजची (ललित प्रभाकर) म्हणजे सिनेमात तरी ते तसंच दाखवलंय, हरवलेल्या नंदिनीला विराज घरी घेऊन येतो आणि पाहुणा म्हणून आलेला विराज त्यांच्यातला एक कधी होऊन जातो कळतही नाही. इथून पुढे सिनेमात आणि नंदिनीच्या आयुष्यात बरेच बदल होतात. एवढ्या कमी वयात झालेला डिमेन्शिया सारखा भयंकर आजार आणि त्यातून होणारी फरफट वगैरेमध्ये विराज तिला काय मदत करतो त्यातून ती सावरते की अधिक गुंतते आणि सिनेमाच्या शेवटी 'स्माईल प्लीज क्षण' येतो की नाही ते सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलंच. पण सिनेमा कसा आहे ते पाहूयात.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
#AnolkhiSong in the enchanting Voice of Sunidhi Chauhan Coming Soon. #SmilePleaseTheFilm #19July A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

 

सिनेमातली कथा अनेक भावनिक क्षण दर्शवते पण त्यातच अनेक प्रश्नही उद्भवतात. सिनेमात नंदिनी एका सुखवस्तू कुटुंबाचा भाग असल्या कारणाने इतर गोष्टी म्हणजे काम, पैसा, आजारावर होणारा खर्च वगैरे गोष्टी तेवढ्या अधोरेखित होत नाहीत. पण ते प्रश्न डोक्यात नक्कीच येतात. शिवाय नंदिनी आणि तिचा नवरा वेगळे का झालेत तो संदर्भ सुद्धा मध्येच डोकावून जातो पण एवढं असून सुद्धा नवरा आणि नंदिनीमधलं नातं खूप छान मैत्रीचं दाखवलं गेलं आहे. पण नुपूरची कस्टडी आई असताना तिच्या बाबाकडे का आणि कशी गेली याबद्दल मात्र कुठलाच संदर्भ येत नाही. त्यात तिची मुलगी नुपूरला विराजसारख्या बाहेरुन आलेल्या माणसाने समजावल्यावर आपल्या आईच्याजवळ जाणारी नुपूरमधला बदल तितकासा पोहचत नाही. पण सिनेमातले अनेक भावनिक क्षण मनाला स्पर्श. अनेक ठिकाणी आळेकरांनी साकारलेला बाप खंबीर असतानाच खचलेला आणि हताश दिसतो तेव्हा तर मन भरुन येतं आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत. आळेकरांच्या काही सीन्समध्ये त्यांचे काही रिअॅक्शन्स ही पुरेशी ठरतात. दुसरीकडे मुक्ताने केलेली बॅटिंग आहेच. डिमेन्शिया हा आजार क्वचित होणारा आहे, त्यातही मुक्ता असलेल्या वयात तर लाखात एक केस असते, त्यामुळे या आजाराचा पेशंट कसा वागतो काय करतो हे बघण्यासाठी तसं काही उपलब्ध नसणारच, त्यामुळे याचा अभ्यास करणं तितकं सोप्पं नक्कीच नव्हतं पण मुक्ताने ज्या पद्धतीने हे पात्र निभावलं आहे क्या बात. अनेक सीन्समध्ये तिने साकारलेली बिथरत चाललेली, सगळं विसरत चाललेली तरीही खंबीर असलेली नंदिनी कमाल करुन जाते. तसंच प्रसाद ओक, ललित प्रभाकर आणि वेदश्री महाजन यांची ही कामं चांगली झाली आहेत. पण या सगळ्यांच्या तुलनेत थोडी कमी पडते ती डॉ. अंजू म्हणजेच आदिती गोवित्रीकर. सिनेमातलं तसं हे महत्त्वाचं पात्र आहे पण त्यातून हवी ती मदत सिनेमाला नक्कीच होत नाही.

तर सिनेमातल्या अभिनयाची बाजू खूपच भक्कम आहे तशी दिग्दर्शनाची सुद्धा उत्तम आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. थोडेफार बारकावे सोडले तर विक्रमने दिग्दर्शक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या हृदयांतर सिनेमाची तुलना या सिनेमाशी करता येणार नाही. पण कुठेतरी त्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. खरंतर सिनेमाच्या कथेत थोड्याफार गोष्टी आहेत ज्या कदाचित उत्तम हाताळल्या गेल्या असत्या तर सिनेमा अधिक खुलला असता असं मला वाटतं. नंदिनीच्या आय़ुष्यात विराजच्या एन्ट्रीने बरेच बदल घडतात. पण त्याची फिल्मी एन्ट्री तेव्हा होते जेव्हा नंदिनीचं कुटुंब पूर्णपणे पाठीशी उभं असतं. त्यामुळे ती एकटी पडलीये आणि तिला विराजची साथ लाभते असंही काही होत नाही. त्यामुळे विराजमधला हिरो हा उगाच अधोरेखित करणं तेवढं गरजेचं नव्हतं. सिनेमाच्या कथेच्या दृष्टीने तरी. सिनेमातले चढ-उतार मनाला भावतात पण त्याचसोबत हवा असलेला प्रभाव सिनेमा कायम करु शकत नाही असं कुठेतरी जाणवत राहतं सतत. पण सिनेमातल्या कलाकारांची कामं, सिनेमातले काही सीन्स, त्याची कथा आणि भावुक करणारे काही क्षण या सगळ्याकडे बघता सिनेमा एकदा नक्कीच पाहू शकता. सिनेमातल्या काही त्रुटी सोडल्यास सिनेमा चांगला झाला आहे हे नक्की. त्यामुळे सिनेमा बघून एक छान हळवा अनुभव घेऊन घरी जाल हे निश्चित. हा सिनेमा नक्कीच तुम्हाला स्माईल प्लीज अनेकदा म्हणेल हे पण तितकंच खरं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी